Wednesday, 25 September 2019

दिवसभर कधी, कुठं फिरता याची गुगलकडे माहिती, खोट वाटत असेल तर तुम्ही चेक करू शकता


       गुगल तुमच्या दिवसभराच्या अपडेट सेव्ह करत आहे. फक्त एकाच दिवसाचे नाही तर जेव्हापासून फिचर सुरु केलं आहे तेव्हापासून तुम्ही कधी, कुठं फिरलात याची माहिती गुगलकडे आहे.

        आजचे युग हे स्मार्टफोनचे युग आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन  असल्याने सारे जग आपल्या मुठीत असल्यासारखा आभास होतो व काही प्रमाणात ते खरेही आहे. क्षणार्धात जगातील घातलेली कोणतेही घटना आपल्याला Whats app व इतर Social Media मुळे सहज समजते. तसेच या स्मार्टफोनवर  ऑनलाइन माहिती सर्च करण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक गोष्टी करता येतात. या सर्वच कामे हातात स्मार्टफोन आल्यापासून सोपी झाली आहेत. आज ची तरुणाई तर सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्यावर जास्त भर देते.  काही कंपनी त्यांना कॅशबॅक हि देते परंतु हे सगळ करत असतांना आपण सगळी माहिती संबधीत कंपनीला अनावधानाने पुरवीत असतो. आपण कोणत्याही वेबसाईट काही माहिती सर्च करणे किंवा खरेदी करण्यासठी गेलो कि त्या वेबसाईट युजर्सची पूर्ण माहिती त्यात पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, पिन कडे, आधार कार्ड, पॅन कार्ड Details, आवडी- निवडी,  घेतली जाते. आपण स्मार्टफोन मध्ये असे अनेक Application  वापरत असतो. त्यावर जी माहिती Application  Install करताना आपल्याकडून दिली जाते ती संबंधित App कंपनी वापरत असते. गुगल आणि फेसबुक या माहितीच्या आधारे जाहिरातीतून पैसे कमावते. पण तुम्हाला कल्पनाही नसेल की गुगल तुम्ही कधी, कुठे, किती वाजता गेला होता याची माहितीही साठवून ठेवते.


    आपण सहज गुगल Map वर माहिती सर्च करतो व ते तेथे सहज सेव  होत जाते.  आपण एखाद्या website वरून एखादी वस्तू Search केली तर आपल्याला दुसर्याही Website वर समोर दाखवली जाते कारण आपण याअगोदर आपण सर्व माहिती त्यांना पुरवलेली असते. त्याचा या Website पुरपूर वापर करतात. फेसबुक किंवा गुगलवर अनेकदा आपल्याला नोटिफीकेशन येतं. यामध्ये जवळच्या चित्रपटगृह, पेट्रोल पंप, एटीएम किंवा एखाद्या बँकेबद्दल काहीतरी विचारलं जातं. फेसबुकवर तर चेक इन करून मिरवत सर्वांना सांगतो की या ठिकाणी आहे. गुगलने यापुढे जाऊन तुम्ही जिथं भेट दिली किंवा थांबलात तिथं कसा अनुभव आला याची माहिती घ्यायला सुरुवात केली. स्मार्टफोन वापरणाऱ्याला याबद्दल प्रश्न विचारला जातो. या माहितीच्या आधारे गुगल त्या ठिकाणाचे रेटिंग ठरवते.

          तुम्ही ज्या ठिकाणी भेट देता ती सर्व माहिती गुगल साठवते. त्याचा एक मॅपही तयार होत असतो. प्रत्येक अपडेट ठिकाणाचे नाव आणि वेळेसह गुगलकडे आपोआप save होत असते. आपल्याला केव्हा कुठे गेलो होतो हे आपण चेक करू शकतो कदाचित आपणही सांगू शकणार नाही इतकी अचूक गुगल तुम्हाला माहिती उपलब्ध करून देईल. किंबहुना आपण जेव्हा पासून मोबाईल घेतला तेव्हा पासून चा रेकॉर्ड सुद्धा गुगल कडे उपलब्ध आहे याला फक्त आत एकच आहे कि, ज्या वेळेल तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेला होता त्या वेळेस तुमच्या फोनचे इंटरनेट व जीपीएस लोकेशन ऑन असायला पाहिजे. जीपीएस ऑफ असेल तर ही माहिती गुगलला मिळत नाही.  हे सर्व तुम्ही पण चेक करू शकता यासाठी आपल्याला मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगइन करावं लागेल. तेथे Map मध्ये जाऊन  “Your Timeline” वर Click करा तेथे तुम्ही वर्ष, महिना, तारीख टाकून त्या दिवसभरात कुठे गेला होतात याची माहिती घेऊ शकता.   यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.          
      हे सर्व नको असेल तर तुम्ही तुमची  लोकेशन हिस्ट्री बंद करूनही गुगलला जाणारी माहिती थांबवू  शकता


Sunday, 8 September 2019

Jio Fiber देणार 500 GB डाटा व100 Gbps speed

        जिओ लॉंच झाल्यापासून मोबाईल क्षेत्रात खळबळ उडाली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नननवीन ऑफर घेवून येते आता जिओने जीओ गिगाफायबर launch केले असून पूर्ण देशभरात 5 तारखेला अधिकृत लॉंच केले असून 6 प्लॉन लॉंच केले आहेत.

1)  ब्रॉंझ प्लॅान ( 699 ) :- Bronze Plan
      या प्लॉन मध्ये ग्राहकांना 699 रूपयाच्या रिजार्चमध्ये 100 जीबी डेटा व 30 दिवसाची व्हॅलिडीटी देण्यात आली असून स्पीड 100  Mbps  पर्यंत असणार आहे. या प्लॅनमध्ये पूर्ण 100 जीबी डेटा व अतिरिक्त 50 जीबी डेटा असा एकूण 150 जीबी मिळणार आहे.

2) सिल्हर प्लॉन ( 849) :- Silver Plan 
       यामध्ये प्लॅनमध्ये ग्राहंकाना 849 रूपयाचे रिजार्च करावे लागणार असून यात ग्राहकांना 200 जीबी डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100  Mbps  ची स्पीड मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना यामध्ये 200 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे म्हणजेच एकूण 400 जीबी हायस्पीड डेटा मिळणार आहे.

3) गोल्ड प्लॅन ( 1299 ) : - Gold Plan 
       या प्लॅनमध्ये ग्राहकांना 500 जीबी डेटा 30 दिवसासाठी मिळणार असून त्याचा स्पीड 250 Mbps असणार आहे. यासोबतच 250 जीबी अतिरीक्त म्हणजेच 750 जिबी डेटा मिळणार आहे. 

4)  डायंमड प्लॅन  2499 :- Diamond Plan  
       या प्लॅन मध्ये ग्राहकांना 1500 जीबी डाटा  दिवसासाठी मिळणार असून  त्याची व्हॅलिडीटी 30 दिवसाची असणार आहे. यामध्ये 1250 जीबी डेटा 500 एमपीबपीएस च्या स्पीडने देणार आहेत. त्यात 250 जीबी अतिरिक्त डेडा मिळणार आहे.

5) प्लॅटिनम प्लॅन 3999  :-  Platinum  Plan 
      या प्लॅॅनमध्ये ग्राहकांना 2500 जीबी डेटा 30 दिवसासाठी मिळणार आहे.  या प्लॅनचा स्पीड 1 जीबीपीएस असणार आहे. या प्लॅनमध्ये सर्वात कमी किमतीत सर्वात जास्त डेटा  कंपनी देते आहे

6) टिटॅनियम प्लॅन 8499 :-  Titanium Plan
     या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका महिन्यासाठी 5000 जीबी डेटा कंपनी देणार असून त्याचा स्पीडही 1 जीबीपीएस इतका जबरदस्त असणार आहे.

ठळक वैशिट्ये :-

*  सर्वच प्लॅन्ससोबत फ्री व्हॉईस देण्यात आले आहेत. याद्वारे भारतात कोठेही मोफत कॉल्स करता येतील. या सेवेसाठी जिओचे JioCall हे अ‍ॅप वापरता येईल. 

*  टीव्ही व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग या सेवा असतील. व्हिडिओ कॉलिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 रुपये, गेमिंग सेवेची किंमत वार्षिक 1,200 (झेरो लेटन्सी नेटसाठी), डिव्हाईस सेक्युरिटी सेवा वार्षिक 999 रुपयात उपलब्ध असेल.

* होम नेटवर्किंग घरातील विविध खोल्यांमध्ये वायफाय मेश तयार करून इंटरनेट पुरवता येईल.
फोटो, म्युझिक, व्हिडिओ शेयर करण्यासाठी सेवा उपलब्ध!

* सुरक्षेसाठी Safety & Surveillance Solution उपलब्ध करून दिले जाईल. ज्यामध्ये डोर कॅमेरा, CCTV, बाळांकडे लक्ष ठेवण्यासाठी बेबी मॉनिटरचा समावेश.

*  आभासी जगाची सफर घरबसल्या करण्यासाठी व्हर्च्युअल रियालिटी हेडसेटचा समावेश थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव.

* जिओ होम गेटवे हा राऊटर असेल जो जिओ फायबरद्वारे वायफाय मार्फत सेवा पुरवेल.

सेवेची किंमत ठळक वैशिट्ये

 सेवा घेण्यासाठी तुम्हाला 2,500 रुपये डिपॉजिट भरायचे आहे (हे एकदाच द्यावं लागेल) यामधील 1,500     रुपये परत मिळू शकतील तर उर्वरित 1,000 रुपये इंस्टॉलेशन चार्ज असेल.  जिओच्या वेलकम ऑफर अंतर्गत जिओ होम गेटवे, 4K Jio Set Top Box मोफत मिळेल.  एक टीव्ही (गोल्ड आणि पुढील प्लॅन्समध्ये म्हणजे दरमहा 1,299 आणि त्यापुढील प्लॅन्स) मिळेल. सोबत OTT सेवांद्वारे चित्रपट, मालिका, गाणी मोफत पाहता येतील.

1. गोल्ड प्लॅन :- 1 वर्षासाठी घेतल्या स Muse 2 Bluetooth speaker मिळेल. 2 वर्षांसाठी घेतला तर 24 इंची  
                        एचडी टीव्ही मिळेल.
2. सिल्व्हर प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास Thump 2 Bluetooth speakers मिळतील.
3. डायमंड प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास 24 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
4. प्लॅटिनम प्लॅन्स :- वर्षासाठी घेतल्यास 32 इंची एचडी टीव्ही मोफत देण्यात येईल.
5. टायटॅनियम प्लॅन :- वर्षासाठी घेतल्यास 43 इंची 4K टीव्ही मोफत मिळेल.

नोंदणी कशी कराल? 

● www.jio.com वर जा किंवा MyJio अ‍ॅप घ्या. JioFiber सेवेसाठी नोंदणी करा. 
● तुमचा पत्ता, नाव, मोबाईल क्रमांक विचारला जाईल. 
● जर तुमच्या भागात जिओ फायबर सेवा असेल तर त्यांचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल पुढील प्रक्रिया       त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल. 
● दरमहा/ चौमाही/ वार्षिक अशा कोणत्याही प्लॅन्सने रीचार्ज केल्यास ग्राहकांना सेट टॉप बॉक्स देण्यात येईल.

Tuesday, 16 July 2019

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी२००५ ला मी कृषी पदविका या दोन वर्षीय  अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. तेव्हा पहिल्यांदाच मी घर सोडून बाहेर राहणार होतो. सर्व कोण असतील कसे असतील काही माहित नव्हते परंतु  २००५-०७ याकालावधीत अनेक जीवाभावाचे मित्र भेटले. आम्ही पूर्ण वर्गात ६० मुले व मुली होतो. २००७ ला कृषी पदविका पासआऊट झाल्यानंतर मला कुणीही भेटले नाही. कुणी पुढील शिक्षणासाठी, तर कुणी नोकरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी एतस्तत: विखुरलो गेलो. त्या वर्षातील आठवणी मनात घर करून गेल्या त्या कायमच्याच. मित्रांसोबत घालवलेले ते क्षण आठवण्या पुरतेच मर्यादित होते. पण ते दिवस थोड्या फरकाने का होईना पण परत अनुभवयाला मिळतील का हा विचार मनात  कायम घुटमळत होता.  
२४ फेब्रुवारी २०१९ ला मी लंच ब्रेक असल्याने जेवण झाल्यावर सहजच फेसबुक चालत बसलो होतोतो समोर उल्हास नेमाडे हे नाव आले मी लगेचच त्या नावावर क्लिक केले असता उल्हास चा फोटो आला मी त्याला लगेच ओळखले. त्याने नाशिकला असल्याचे सांगितले आणि बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या मी त्याला म्हटले काही कुणी संपर्कात आहे त्यावर तो म्हणाला आपला कृषीचा व्हाट्सअप गृप आहे. त्याने मला लगेच ग्रुप मध्ये करायला सांगितले. व हर्षले धांडेने मला २८ मार्च २०१९ ला ग्रुप मध्ये  करून घेतले. १२ वर्षानंतर मी मित्रांच्या संपर्कात आलो होतो मला जुने दिवस आठवू लागले. व आठवणीना नवी पालवी फुटू लागली. सुरुवातीला या ग्रुपमध्ये  कमी मेम्बर होते परंतु जसे जसे मित्र एड होत गेले तसतसा संपर्क वाढत गेला. बरच दिवस गप्पा रंगू लागल्या . सर्वाना एकमेकाच्या भेटीची उत्सुकता लागली होती आणि सर्वांनी भेटायचे ठरवले व तब्बल १ महिन्यानंतर सर्वांच्या विचार विनिमयाने ठिकाण  व वेळ ठरली. वेळ होती दि. १४ जुलै  २०१९  व ठिकाण होते जेथे आमचे शिक्षण  पूर्ण झाले ते कृषी विद्यालय निंभोरा. या ठिकाणी आम्ही २ वर्ष सोबत घालवलेले होते.   या ठिकाणी शिक्षणासाठी आम्ही एकूण मुले व मुली मिळून ६० होतो. परंतु ग्रुपला आम्ही ४६ मेंबर आहोत परंतु भेटण्यासाठी यायला फक्त २० च तयार झाले. बऱ्याच जणांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे तर काही जणांना त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे येता आले नाही.  सेवकराम धांडे, हर्शल धांडे, अमित धांडे, तुषार जावळे, गोपाल पाटील, नबी तडवी,  अमोल पाटील, योगेश महाले, प्रकाश गाढेकर, घनश्याम चौधरी, चंदू जावळे, भरत मोरे, समाधान भिल्ल, समाधान भालेराव, पंकज पाटील,  अमोल गिरडे, निलेश लोखंडे, संदीप तायडे, संतोष तायडे, विकुल महाजन व  मी परमेश्वर थाटे  इत्यादी मित्र एकत्र आलो.
१४ जुलै ला आम्ही एक तपानंतर एकत्र भेटणार होतो. कुणाच्या शरीर यष्टीत बदल झालेला असेल का ? ते ओळखु येतील का ?  कुणी कसे दिसत असेल अशा शंका मनात निर्माण होत होत्या व भेटल्यानंतर लगेचच सर्व प्रश्नाचे निरसन झाले. थोड्या बहुत फरकाने सर्वामध्ये बदल झालेला होता.  भेटल्यानंतर सर्वच जुन्या आठवणीत  रममाण झाले. प्रत्येक जन जुन्या आठवणीना उजाळा  देत होता. व आपल्या मनातील आठवणीचा कप्पा उघडत होता. व घडलेल्या  गमती जमती सांगत होता. यावेळी मनसोक्त व दिलखुलास हसलो व वाटत होते  कि ते दिवस पुन्हा आपल्या जीवनात परत यायला हवे.  परंतु ते शक्य नव्हते.  कारण गेलेली वेळ कधीही परत येत नाही.  मित्रांसोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणांचा हेवा वाटत होता. खूप वर्षांनी जणू झाडाला नवी पालवी फुटलेली होती.     

 आम्ही ज्या वर्गात शिक्षण ग्रहण केले होते त्या वर्गातील आम्ही ज्या बाकावर बसलो होतो ते बाक अजूनही तसेच होते. व आम्ही त्या बाकावर बसून जुने दिवस आठवू लागलो व सर्वांनी फोटो हि काढले व जुन्या आठवणींना उजाळा देत होतो.

बऱ्याच वेळा गप्पा मारल्यानंतर दुपारी मस्त पैकी जेवणाचा बेत होता त्या जेवणाच्या मेनूत फौजदारी दाळ व पोळ्या हा मस्त आयटम होता. याचे सर्व नियोजन आमच्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मित्र व पाल येथे अध्यापनाचे पवित्र काम करनारे सेवकरामभाऊ धांडे   यांनी केलेले होते. दुपारी १.३० वाजता मनसोक्त जेवणाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा जुन्या आठवणीत रममान झालो.  हि वेळ सरू नये असे प्रत्येकाला वाटत होते.  हि उत्सुकता इथेच न संपवता पुढील भेटीच आम्ही नियोजन केले व त्याची तारीखही ठरली . ३० ऑक्टोबर २०१९ ला आज जे आले नाहीत  त्या सर्वाना घेऊन परत भेटायचे असे ठरवून  व मन घट्ट करून आम्ही एकमेकांना निरोप दिला  तेथून कुणाचाही पाया निघत नव्हतो. अखेर दुपारी ४.०० वाजता परतीच्या मार्गाला लागलो. हा मैत्रीचा ओलावा असाच अबाधित ठेऊन आपल्या उर्वरीत सवंगड्यांचा शोध घेऊन आम्ही त्याना ग्रुपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत  व आमचा पूर्ण ६० चा वर्ग पूर्ण करणार आहोत .