Parmeshwar Thate: कमालीचा जादुगार गुगल

Wednesday, 24 September 2014

कमालीचा जादुगार गुगल


गुगल हे एक उत्तम आणि सर्वात जास्त वापरले जाणारे शक्तीशाली सर्च इंजीन आहे, पाण्यासोबतच अनेक मजेदार सर्च रिझल्ट आहे, ज्या विषयी आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेलही. 
येथे गुगल मधील उत्कृष्ट अशा tricks, Easter eggs आणि secrets आहेत -

Google Sphere :- 
             www.google.com वेबसाईट ओपन करुन गुगलच्या सर्च बारमध्ये Google Sphere टाईप करुन I’m feeling lucky” या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकवर क्लिक करावे..


      आपल्याला येथे असे ‍दिसेल कि येथील सर्व गोष्टी स्क्रिनवर तरंगत आहेत. जेव्हा आपण येथील सर्चमध्ये काही टाईप करुन सर्च केले तरी आलेला सर्च रिझल्टही तरंगू लागेल. आणी तो तुम्ही जसा माउस पॉईंटवर फिरवाल त्याच गतीने  व दिशेने मॅटरही फिरले.  Google sphere कि अतिशय गमतीची आणि मजेशिर ट्रिक आहे. या तरंग त्या गोष्टीभोवती माऊस पॉइंटर फिरवा आणि करमणूक करा. 

2) Google Gravity:-
         गुगलच्या सर्च बारमध्ये Google Gravity टाईपकरुन “I’m feeling lucky” वर क्लिक करा किंवा या लींकला क्लिक करा.. 

        येथे तुम्हाला दिसेल कि गुगलने त्याचे गुरुत्वाकर्षण हरवले आहे आणि यातील सर्व गोष्टी खाली पडताहेत. तुम्ही यातील सर्चबार टाईप करुन सर्च केलें तरी यातील सर्च रिझल्टसुध्दा खाली पडतो. यातील कोणत्याही गोष्टीवर क्लिक करुन इकडे तिकडे फेका तुम्ही जसा मजकूर फेकाल तसाच ते फिरेल आणि गंमत बघा. 

3) Google Gravity Water:
        गुगलच्या सर्च बारमध्ये या आकर्षक परिणामात गुगल मधील सर्व गोष्टी पाण्याखाली पडतात. गुगलच्या सर्च बारमध्ये Google Gravity टाईप करा. आणी “I’m feeling lucky” या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकला क्लिक करा.

        Google Gravity Underwater हा एक आश्चर्य कारक परिणाम आहे. यात सर्च रिझल्ट सुध्दा पाण्याखाली तरंगतात. टाईमपास करण्यासाठी यातील सर्व वस्तू क्लिक करुन वर फेकाव्यात किंवा पाण्यावर लाट तयार करायची असल्यास माऊस खालूनवर ड्रॅग करावा. 

4) Zerg Rush:-
           Zerg Rush हे एक Google easter egg आहे. गुगलच्या सर्च बारमध्ये "ZERG RUSH" टाईप करुन कि बोर्डवरील Enter कि प्रेस करावी आणि एक गेम खेळावा.


        यात तुम्हाला अनेक O चा समुह तुमचा सर्च रिझल्ट खातांना दिसेल. तुम्ही तुमचा सर्च रिझल्ट वाचविण्यासाठी  O वर क्लिक करुन गायब करु शकता. 

5 ) Make tilt Google:
           

    गुगलच्या सर्च बारमध्ये tilt टाईपकरुन Enter किप्रेसकरावी. आताआपल्याला  आपल्या गुगलचे पेजएका बाजूला खालच्या बाजूला झुकलेले दिसेल.

6) Spin Google :- 
     

           गुगलच्या सर्च बारमध्ये do a barrel roll असे टाईप करुन Enter कि प्रेस करावी आणि आपल्याला काही काळासाठी गुगल गरागरा फिरतांना दिसेल. 

7) Draw a heart shape:-
     
       बहुतेक वेळा आपल्याला कठीण कठीण आलेख काढावे लागतात. त्या साठी काही साप्टवेअर बाजारात उपलब्ध होत नाहीमिळतातही परंतु त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. परंतु तुम्हाला जर असे आलेख काढायचे असतील तर तुम्ही गुगल सर्च इंजिनचा वापर आलेख काढण्यासाठी करु शकता. 


       पुढील समीकरण कॉपी करुन गुगलमध्ये पेस्ट कराआणितुम्हाला सर्च रिझल्ट मध्ये हृदयाच्या आकाराचे आलेख दिसेल. तुमचा मित्र किंवा मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. 
sqrt(cos(x))*cos(300x)+sqrt(abs(x))-0.7)*(4-x*x)^0.01, sqrt(6-x^2), -sqrt(6-x^2) from -4.5 to 4.

No comments:

Post a Comment