Wednesday, 5 November 2014

आता SMS ने करा रेल्वेचे तिकीट बुक

रेल्वेने आपल्याला या अगोदर IRCTC च्या संकेतस्थळावर दिलेला लॉगीन आय डी  पासवर्ड वापरून रेल्वेचे ‍रिझर्वेशन  करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिलेलीच आहे. आणी त्यासाठी रेल्वेबोर्डाने त्यात वेळोवेळी बदलही केलेले आहेत. व ते संकेतस्थळ अद्यावत केलेले आहे. आता रेल्वेने आपल्याला मोबाईलद्वारे एसएमएस थ्रू तिकिट बुकिंग सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर बँक आणी IRCTC रजिस्टर्ड करावे लागेल. बँक आपल्याला पेंमेटसाठी MMID (मोबाइलमनीआइडेंटिफायर) आणी OTP(वनटाइमपासवर्ड) देईल. MMID  आणी  OTP मिळाल्यावर मोबाईलच्या मॅसेज बॉक्स मध्ये टाईप करा. उदा. Book
 (स्पेसस्टेशन (ज्या ठिकाणाहून आपल्याला प्रवास करावयाचा आहे ते ठिकाण ) काकोड (स्पेस), स्टेशन ज्याठिकाणनापर्यंत आपल्याला प्रवास करावयाचा आहेता त्या स्टेशनचे नाव) काकोड (स्पेस) यात्रेचा दिवस dd/mm (स्पेस) क्लास (स्पेस) प्रवाशाचे नाव (स्पेस) वय (स्पेस) M/F (स्पेस) टाईप करावा लागेल. त्यानंतर मॅसेज आपल्याला  139 किंवा  5676714 वर SMS पाठवावा लागेल.तिस-याटप्यातSMs मिळाल्यानंतर IRCTC आपल्याला ट्रांझिक्शनआईडी पाठवेल. आता आपल्याला  PAY च्या नंतर ट्रांझिक्शनआईडी आणी  OTP लिहून SMS पाठवावा लागेल. आता येथे तिसरा भाग संपतो.तिसरा भाग पूर्ण झाल्यावर आपले तिकीट बूक होईल. आणी तुमच्या अंकाउटमधून पैसे कापले जातील.  यानंतर  IRCTC  कडून आपल्याला एक  SMS मिळेल.
त्यात आपल्याला आपले तिकीट कनफर्म झाले आहे हे सांगितले जाईल. या SMS मध्ये आपली सर्व माहिती  राहील. हा मॅसेज म्हणजेच तुमचे तिकीटाचा पुरवा राहील. प्रवासात आपल्याला तिकीट मागितल्यावर हा मॅसेज दाखवावा लागले.  परंतु ही SMS  ‍स्कीम सकाळी  8 ते  12 वाजेपर्यंत ARP/त्का/जनरल तिांसाठी उपलब्ध आहे.
(

No comments:

Post a Comment