Parmeshwar Thate: गुगल मॅप्समुळे आता कुठेही फिरा विना गाईड "लोकल गाईड 9.4 व्हर्जन"

Tuesday, 10 March 2015

गुगल मॅप्समुळे आता कुठेही फिरा विना गाईड "लोकल गाईड 9.4 व्हर्जन"


           
गुगल मॅप्स आतापर्यंत आपल्याला वेगवेगळे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती पुरवित होते. त्यामुळे अनेक टूरिस्ट लोकांना त्यांची भरपूर मदत होती. त्यामुळे गुगल मॅप्स हे भरपूर लोकप्रिय ठरले आहे. अ‍ॅण्ड्राईड मोबाईलमुळे तर लोकांना पूर्ण जग जवळून पहायला मिळते. त्याच्या बरोबरीन मार्केटमध्ये भरपूर नवीन मॅप्स वेबसाईट स्पर्धा करण्यासाठी उतरल्या आहेत. स्पर्धेत गुगलने पुढाकार घेत त्यांचे नवीन मॅप फिचर लाँच करीत आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 

       गुगल मॅप्सच्या अँड्रॉईड ऍप्लीकेशनमध्ये आता लोकल गाईड ही नवीन सुविधा प्रदान केली आहे. त्यासाठी गुगलने 9.4 हे व्हर्जन लाँच केले यात  जगातील 220 देशांमधील तब्बल दहा कोटी पर्यटक स्थानांमधील स्थानिक व्यावसायिकांबद्दल माहिती देण्यात आली आहे. या भागातील उपहारगृहे, हॉटेल्स, विविध स्टोअर्स एवढेच नव्हे तर वाहतुकीच्या स्थितीबाबतही माहिती देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यात ज्या भागाचे स्ट्रीट व्ह्यु उपलब्ध आहेत त्यांचे देण्यात येतील. तसेच व्हॉईस नॅव्हिगेशनची सुविधादेखील यात राहणार आहे.
       परिणामी गुगल मॅप्सचा उपयोग करून कुणीही जगभरातील महत्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर कुणालाही विचारपुस न करता बिनधास्तपणे फिरू शकतात.

             गुगलचे 9.4 हे व्हर्जन डाऊनडोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment