Parmeshwar Thate: ब्लॉग कॉपी पेस्ट पासून वाचवा

Wednesday, 1 July 2015

ब्लॉग कॉपी पेस्ट पासून वाचवा

मित्रानो आज प्रत्येकाला वाटते की आपली स्वत: अशी एक वेबसाईट असावी व त्या वेबसाईटवरून आपण जमा केलेली माहिती व विचार लोकापर्यंत पोहोचवावे. परंतु असे करायचे असेल तर वेबसाईटचा डोमेन एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी व अधिकही विकत घेता येतात. परंतु सर्व सामान्यांना या गोष्टी न परवडणार्‍या आहेत व ते तितके सोईस्करही नसते. त्यासाठी विशेष शिक्षण व प्रशिक्षणही घ्यावे लागते. परंतु जर अशी वेबसाईट फ्रीमध्ये वापरायला मिळाली तर...  हो हे शक्य आहे. तुम्ही जीमेलचा डोमेन फ्रीमध्ये वापरून अशी वेबसाईट बनवू शकता. परंतु याला काही मर्यादाही असतात. 

 वेबसाईटप्रमाणे ब्लॉगही तितकेच फेमस ठरत आहेत. काही मर्यादा सोडल्या तर ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपले विचार व लिखाण हे लोकापर्यंत पोहोचवू शकतो. ब्लॉग हा एक चांगले माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे. आपण आपपल्या ब्लागवर  मेहनत घेवून माहिती गोळा करून ती टाईपिंग करून आपल्या ब्लागवर पोस्ट करतो आणि आपण संग्रहीत केलेली माहिती कोणीही व्यक्ती सहज कॉपी करून त्या माहितीचा दुरूपयोग करतात. असा दुरूपयोग करायला जर आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर त्यात आपण काही क्लुप्त्यांचा वापर करून ते थांबवू शकतो.  मित्रानो अशाच प्रकारची क्लुप्ती वापरून तुम्ही तुमचा ब्लॉग सुरक्षित ठेवू शकतात याची क्लुप्ती मला सापडलेली आहे. ती आज मी तुम्हाला संागणार आहे.  
यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमचा ब्लॉग लागीन करावा लागेल व नंतर लॉगीन केल्यानंतर डिसाइन टेम्पलमध्ये जावून पुढील प्रमाणे कृती करा. 


Layout
Temple->edit html वर जावून <body>  हे सर्च करा. (ctrl+F येथे आपण शॉर्टकट कीचा पण वापर करू शकतो. )

आता खाली दिलेला कोड <body> च्या जागी पेस्ट करा.

<body onmousedown="return false" oncontextmenu="return false" onselectstart="return false">

         टेम्पेल प्रिव्हू पाहून सर्व जर व्यवस्थीत जर असेल तर टेम्पेलला सेव करून घ्या. 

No comments:

Post a Comment