Monday, 13 July 2015

इंटरनेटचा वापर करताना येणारे Error


इंटरनेटच्या वापरात तरूण-तरुणी अग्रेसर आहेत. तसे तर आता लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. इंटरनेटचा वापर करीत असतानाच अनेकदा ते बंद पडते, त्यात काहीतरी 'एरर' येतो आणि आपण जाम वैतागतो. आपण भेट दिलेल्या वेबसाईटवर एरर आल्यावर पुढे काय असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. त्यासाठी इंटरनेटवर काम करीत असताना एरर का येतात याची माहिती घेणे आवश्यक आहे.

४०४ नॉट फाउंड :- 
        वेब ब्राउजिंग करताना सर्वात जास्तवेळा दिसणारा हा एरर आहे. तुम्ही ज्या वेबसाइटचा अॅड्रेस टाइप केला आहे, ती वेबसाइट अस्तित्वात नसल्याने अथवा बंद करण्यात आल्याने अशी एरर दिसते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही टाइप केलेल्या अॅड्रेसचे स्पेलिंग बरोबर आहे का याची खात्री करून घ्या.

अनेबल टू कनेक्ट :- 
      एखाद्या वेबसाइटचा स्वतःचा सर्व्हर डाउन असेल तर अशा पद्धतीचा एरर मेसेज आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळी तुमचे सर्व्हर किंवा इंटरनेट कनेक्शन व्यवस्थ‌ित काम करत असते. मात्र, तुमच्या संगणकाची फायरवॉल किंवा प्रॉक्सी यांनी रोखल्यामुळे हा एरर येतो.

मालवेअरचा एरर :- 
      तुम्ही क्रोम, फायरफॉक्स, किंवा अन्य कोणत्याही ब्राउजरच्या मदतीने इंटरनेट सर्फिंग करत असाल तरी देखील अशी एरर तुम्हाला पाहायला मिळेल. याचे कारण संबंधित संकेतस्थळामध्ये धोकादायक व्हायरस अथवा मालवेअर असण्याचा धोका असतो. असे मालवेअर संगणकातील सर्व माहिती चोरून आपल्या सर्व्हरकडे पोहचवण्याचे काम करतात. यामुळे अशा संकेतसथळाचा वापर टाळावा.

सर्टिफिकेट एरर :- 
         वेब ब्राउजिंग करताना बऱ्याचवेळा येणारी ही अडचण वापरकर्त्याला बुचकाळ्यात पाडते, पण खरे तर ही अडचण नसून सावधानतेच्या इशारा असे म्हणणे योग्य ठरेल. एचटीटीपीएसच्या माध्यमातून एखादी वेबसाइट ओपन करताना ही अडचण येते. प्रत्येक वेबसाइटला एक सुरक्षा प्रमाणपत्र दिलेले असते. त्याला एसएसएल सर्टिफिकेट म्हणतात. नेटबँकिंग अथवा बँकेच्या संबंधित संकेतस्थळ आेपन करताना अशा प्रकारची एरर दिसू शकते. याचे कारण त्यावेळी तुमचे इंटरनेट कनेक्शन सुरक्षित नसते. अशा वेळेस संंबंधित संकेतस्थळाचा वापर टाळा. अशाप्रकारचे एरर आणि त्यांची माहिती तुम्हाला असल्यास त्या त्या वेळी त्या वेबसाईटचा वापर करावयाचा किंवा नाही हे तुम्ही निश्चित करू शकाल.

No comments:

Post a Comment