Sunday, 1 November 2015

आता बुकमार्क करा हॉटस्अ‍ॅपवरही

            स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी व्हॉटस्अप नेहमी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देत असतात. अशी एक सुविधा व्हॉटस्अप उपलब्ध करून देत आहे. ते म्हणजे बुकमार्क.
        आपण इंटनेट एक्सप्रोलर, गुगल क्रोम, मोझिला, यु.सी. असे अनेक ब्राऊझर वापरलेले आहेत.या मधे एक सुविधा आपण नक्कीच वापरलेली असेल ती म्हणजे आपल्याला आवडलेला मॅसेज किंवा लिंक किंवा एखादे वेबपेज आपण बुकमार्क करून ठेवू शकतो. म्हणजेच ते आपल्याला हव्या त्या वेळेस आपण ते पाहू शकतो.  हॉटस्अ‍ॅपवर आता कुणीही युजर आपल्याला आवडणारा मॅसेज बुकमार्क’ करू शकणार आहे. अर्थात नंतरही तो संदेश संबंधीत युजरला सहज पाहता येणार आहे.       
 आपण आपल्याला आवडणारी वेबसाईट नंतर पहावयाची असल्यास बुकमार्क’ करून ठेवतो. यासाठी प्रत्येक ब्राऊजरमध्ये व्यवस्था असते. तसेच यासाठी खास वेबसाईट आणि अ‍ॅप्लीकेशन्सही आहेत. याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीने आपल्याला वैयक्तीकरित्या वा ग्रुपवर पाठविलेले मॅसेज ( ऑडिओ, व्हिडीओ, छायाचित्र आदी बाबींना) आजवर पाहण्यासाठी संबंधीत व्यक्ती वा त्या ग्रुपवर जाण्यावाचून कोणताही पर्याय नव्हता. आता मात्र तारांकीत पोस्टच्या माध्यमातून ही सुविधा मिळणार आहे.

       आयओएसवर गेल्याच महिन्यात ही सुविधा देण्यात आली आहे. आता अँड्रॉईडवरून व्हाटसअ‍ॅप वापरणार्‍यांनाही बीटा व्हर्शन’मध्ये याला प्रदान करण्यात आले आहे. या अंतर्गत आपल्याला आवडलेल्या पोस्टवर आपण बोट दाबून धरल्यास वरील बाजूला (जिथे डिलीट, कॉपी आणि फॉरवर्डचा पर्याय असतो त्याच्या शेजारी!) एक स्टार दिसेल. यावर क्लिक केल्यावर संबंधीत पोस्ट ही बुकमार्क होणार आहे. यानंतर आपण कधीही ती पोस्ट सहजपणे पाहू शकणार आहे. यासाठी आपल्याला स्टार्ड मॅसेज’ या विभागात जावे लागणार आहे. नवीन ग्रुप, नवीन ब्रॉडकास्ट, व्हाटसऍप वेब आदी पर्यायाखाली याला स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉईडच्या सर्व युजर्सला अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा मिळणार आहे.

No comments:

Post a Comment