Friday, 15 January 2016

गुगलमध्ये मराठी सर्च करण्यासाठी एक नवी क्लुप्ती


       बर्‍या जणांना इंटरनेटवर सर्च करीत असतांना मराठी मजकूर हवा असतो परंतु तो हवा तेवढा व हवा तसा मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या मजकूरावर त्याला समाधान मानावं लागत.  परंतु मी आपणाला त्यासाठी उपयोगी पडेल अशी क्लृप्ती आज सांगणार आहे. 
      आपण जुन्या काळात कल्पवृक्षा विषयीच्या कथा आपल्या ज्येष्ठांकडून कडून किंवा आजी आजोबांकडून ऐकल्या असतील कल्पवृक्ष म्हणजे असं झाड की ज्याच्या खाली जावं आणि मनात येईल ते मागाव तुम्ही जे काही मागाल जे  मागता क्षणी ते तुमच्या समोर हजर होत.  कल्पवृक्षाचं हे वैशिष्ट्य गुगलच्या वैशिष्ट्याशी खूपच मिळतं जुळतं आहे. फक्त गुगल तुम्हाला ज्या विषयी माहिती हवी त्या माहितीचे स्त्रोत मागता क्षणी समोर हजर करतो. त्यामुळे गुगल हा माहितीचा कल्पवृक्ष असे संबोधन काही वावगं ठरणार नाही.
जर एखाद्या व्यक्तीला जळगाव जिल्ह्याविषयी काही माहिती हवी असेल तर त्याने गुगल सर्च इंजिनवर ‘जळगाव जिल्हा’ हा मजकूर युनिकोड स्वरूपात इंग्रजी भाषा निवडलेल्या पानावर सर्च केला तर त्याला 8,86000 शोध 0.77 सेंकदामध्ये मिळतात  परंतु 
शोधासाठी इंग्रजी भाषा निवडलेले पान

      जर शोधकर्त्याने सर्च इंजिनची मराठी भाषा निवडलेली असेल आणि गुगल सर्च इंजिनवर ‘जळगाव जिल्हा’ हा मजकूर युनिकोड स्वरूपात सर्च केला तर त्याला 9,07,000 आणि तेही 0.77 सेंकदात शोधकर्त्यासमोर हजर होतात. 

शोधासाठी मराठी भाषा निवडलेले पान

            हा फरक तेवढ्यावरच थांबत नाही. इंग्रजी पानावर आपण जेव्हा देवनागरी शब्द शोधतो तेव्हा त्यांच्या सर्च रिझल्टसमध्ये हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा समाविष्ट होतात. त्यातही तुलनेने त्यात हिंदी रिझल्टस अग्रक्रमाने आलेले आढळतात. म्हणजे वरिल सर्च केलेल्या रिझल्टच्या तुलनेत 21000 रिझल्टस मुळातच कमी, त्यात पुन्हा हिंदी रिझल्टस अग्रक्रमाने अशी स्थिती दिसते. पण जेव्हा मराठी गुगल पानावर आपण शोध घेतो तेव्हा आपल्याला शुद्ध मराठी रिझल्टस मिळतात, तेही जास्त. (आपल्या गुगल कथा च्या उदाहरणात 21000 रिझल्टस जास्त मिळाले).
          इथे ही सोपी पध्दत यासाठी सांगितली की काही मजकूर जर मराठीत शोधायचा असेल तर  मराठी भाषा निवडून शोधा इंग्रजी पानावरील मजकूरपेक्षा जरा जास्त मजकूर तुम्हाला नक्की मिळेल. 
         त्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे गुगल मराठी निवडा.No comments:

Post a Comment