Friday, 1 January 2016

मराठी टायपिंग व युनिकोड

 मंगल टंक :-

        मंगल फाँट मराठीतीलच नव्हे तर भारतातला पहिला ओपन सोर्स फाँट आहे.हा ' मंगल फाँट 'प्रा.र.कृ.जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. मंगला हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मंगल (आवृत्ती १.२०) हा युनिकोड आधारित ओपन टाईप देवनागरी फाँट "ट्रू टाईप आऊटलाइन" सह विंडोज Windows XP, Windows XP SP2 प्रणालींसोबत पुरवला जातो.प्रा.रघुनाथ कृ .जोशी यांनी बनवलेली फाँट आवृत्ती मायक्रोसॊफ्ट कॉर्पोरेशन तिच्या विंडोज संगणक प्रणालीसोबत वितरीत करते. मंगल फाँटमध्ये ६७५ ग्लिफ्स आहेत. अर्थात फाँटचा उपयोग तुम्ही तो इन्स्टॉल केला आहे का यावर अवलंबून आहे.

मंगलचा इतिहास :- 

     आज ऑर्कुटवर, जी-मेलवर मराठीत लिहिता येते, नेटवर मराठी ब्लॉग आणि साइट्स खो-याने झालेत, एवढंच नाही तर कॉम्प्युटरवर मराठी लिहिण्यासाठी ऑनलाइन मराठी वर्ड प्रोसेसरही सज्ज झालेत. या सा-या मराठी ई-लेखनात जो फाँट सर्वाधिक वापरला जातो तो मंगल फॉंट मराठीतीलच नव्हे तर भारतातला पहिला ओपन सोर्स फॉंट आहे. आता मायक्रॉसॉफ्टनेही हा फॉंट स्वीकारला असून त्याचे निर्माते प्रा. र. कृ. जोशी हे आहेत ही बाब अनेकांना माहीत नसते. युनिकोडवर आधारित हा ' मंगल ' फाँट वापरून आज शेकडो मराठी पाने कॉम्प्युटरवर रोज तयार होतात. हा ' मंगल फाँट ' प्रा . र. कृ . जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. या आधी मराठीत ज्या साइट्स होत्या त्यासाठी फॉंट डाउनलोड करावा लागत असे. नंतर डाउनलोड न करता साइट दिसेल असे डायनॅमिक फॉंट वापरले जाऊ लागले. पण मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० लाँच केले आणि मराठीचा ई-व्यवहार पूर्णपणे बदलून गेला. युनिकोडच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळे की-बोर्ड आणि वेगवेगळं एन्कोडिंग यापासून मराठीसह भारतीय भाषांना मुक्ती मिळण्यास सुरुवात झाली. एकंदरीत भारतीय भाषांचा प्रवास काँम्प्युटरवर तरी प्रमाणीकरणाच्या दिशेने सुरू झाला.एकविसाव्या शतकात भारतीय भाषा टिकवायच्या असतील तर त्या कॉंम्प्युटरमध्ये वापरता यायला हव्यात हा रकृंचा आग्रह होता. यासाठी त्यांनी स्वत : कॉंम्प्युटरचे तंत्रज्ञान आत्मसात करून फाँटनिर्मितीस सुरुवात केली. स्वतः प्रत्येक अक्षरावर मेहनत घेऊन मराठीतील क्ष, ज्ञ, श्र यापासून ते द्य, द्व अशा जोडाक्षरांना या फॉंटद्वारे नीट मांडता येईल याची काळजी घेतली. आजही या फाँटमधून मराठी, हिंदी, संस्कृत, नेपाळी आदी देवनागरी लिपीतले सर्वाधिक व्यवहार चालतात. 'मंगला' हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मायक्रॉसॉफ्टने हा फॉंट स्वीकारतानाही हेच नाव कायम ठेवले. आज विंडोजमध्ये होणारे जवळपास सर्वच देवनागरी व्यवहार मंगलमधून होतात. पण ती मंगल कोण आणि या फाँटमागे असणारे र. कृ. जोशी हे नाव आपण कायमच विसरून जातो. आज आपण मराठीत लिहू शकतो या मागे रकृंनी घेतलेले अपार कष्ट आहेत. म्हणून मराठीचा हा डिजिटल प्रवास समृद्धीच्या दिशेने जात असताना त्याच्या पायाचा दगड घालणा-या रकृंना विसरता येणार नाही.


मराठी टायपिंग व युनिकोड  वर दिलेल्या फाईल एकदा डाऊनलोड करा त्या सर्व फाईल zip स्वरुपात असल्याने आपणाला प्रथम  संगणकावर winzip  किंवा winrar सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन संगणकावर इंस्टॉल करा नंतर या फाईल right  click करुन extract here वर क्लिक करा ..
विंडोज xp साठी प्रथम INDIC FILE वर राईट क्लिक करुन  EXTRACT HERE करुन त्यातील I-COMPLEX FILE इंस्टॉल करण्यासाठी त्या फाईलवर डबल क्लिक करा नंतर install i-complex वर क्लिक करा. ह्या फाईल संगणकावर सेव होतील नंतर कॉम्प्यटर restart  करा. नंतर xp साठी ३२बीट ची फाईल इंस्टॉल करा .
 i-complex ही फाईल windows 7 व ८ साठी इंस्टॉल करण्याची आवश्यकता नसते.  त्यासाठी फक्त ६४ बीट ची फाईल इंस्टॉल करा .  
नंतर पुढीलप्रमाणे स्टेप करा . START> CONTROL PANEL> REGIONAL &LANGAUGE SETTING > MARATHI LANGUAGE> SELECT IME 5.2 KEYBOARD 
वरील सॉफ्टवेअर एकदा मोबाईल किंवा इंटरनेट वरुन एकदा डाऊनलोड केल्यावर संगणाकावर इंस्टाल करताना इंटरनेट ची आवश्यकता नसते . पण गुगल चे सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना इंटरनेट्ची आवश्यकता असते.  त्याचबरोबरhttp://www.marathityping.com  यावेबसाईटवरही  PRAMUKH IME MARATHI उपलब्ध आहे ते कॉप्युटर वर डाऊनलोड करुन इंस्टॉलकरा. किंवा गुगल वर MICROSOFT MARATHI INPUT TOOL  सर्च करुनही software download करता येईल. KEYBOARD  FLY OPTION SELECT केल्यावर आपणाला जे अक्षर दाबु त्याची पुर्ण बाराखडी आपणाला दिसते . capital letter साठी shift+ key दाबा उदा.  त साठी t , ट T ,  थ- th , ठ -Th 
===========================================================================
 

युनिकोड compatible फाँट टंक म्हणजे काय?

संगणकाच्या निर्मितीपासून ते अगदी अलीकडे पर्यंत त्याचा वापर प्रामुख्याने इंग्रजी या भाषेत व रोमन लिपीत होत असे. युनिकोड हे प्रमाण जगातील मुख्य भाषांना संगणकावर स्थान मिळवून देण्याकरिता बनवण्यात आले . ह्यापूर्वी असलेले सर्व संगणक ASCII ह्या एकमेव प्रमाणानुसार काम करीत असत. वाढत्या औद्योगिकरणामुळे आणि इतर स्थानिक भाषिक ग्राहकोन्मुख होण्याकरता सोफ्ट्वेअर उत्पादक आपल्या उत्पादनात देखील युनिकोड ह्या मानाकाला आधार देण्याचा विचार करत आहेत.
ASCII मानकात जास्तीत जास्त २५६ अक्षरांना स्थान देता येऊ शकत होते. युनिकोड मध्ये जगातील असंख्य भाषा व त्यांची मुळाक्षरे ह्यांची संख्या अगडबंब असल्याने आत्ताच्या वेळेनुसार १७ गुणिले ६५५३५ इतक्या अक्षरांना (काही विशिष्ठ चिह्ने आणि नियंत्रक अक्षरे वगळता) समाविष्ट करता येऊ शकते. म्हणूनच कोणताही एखादा 'युनिकोड' आधारित टंक, सगळ्या भाषांना अंतर्भूत करू शकत नाही. युनिकोड आधारित टंकात १ किंवा त्याहून जास्त भाषांची अक्षरे समाविष्ट असतात.
मराठी भाषा प्रमाणभूत पद्धतीत दिसण्यासाठी 'देवनागरी' युनिकोड क्रमांकाची अक्षरे असणारा टंक आपल्या संगणकात असणे ही मुलभूत गरजांपैकी १ प्राथमिक गरज आहे.
Microsoft च्या Windows XP वा त्यापुढील आवृत्या मध्ये 'मंगल' हा अतिशय परिश्रम पूर्वक बनवलेला देवनागरी अक्षरे युनिकोड प्रमाणानुसार आहे. जवळ जवळ आघाडीच्या सर्व वेब साईट ज्यात युनिकोड देवनागरी वापरले आहे त्या मंगल ह्या टंकत पहावयास मिळतात. मंगल हा टंकला देवनागरी 'System' टंक असेही म्हणता येईल.
  युनिकोड वापराचे फायदे :-
    १) युनिकोड ही जगमान्य प्रणाली असुन आपण ईमेल , फेसबुक , किंवा वेबसाईटवर ही आपण मराठीतुन लिहिता येते. आपण इतरांना e-mail ने माहिती पाठविल्यास त्यांच्याकडे फॉन्ट नसला तरी ती माहिती त्यांना MANGAL  या फॉन्ट मध्ये दिसते. हा फॉन्ट विंडोज च्या operating system वर default असतोच . हा फॉन्ट दिसायला ओबडधोबड असल्याकारणाने इतर काही  फॉन्ट डाऊनलोड करा. 
2) SAKAL MARATHI, LOHIT MARATHI, हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सर्वात खाली download font वर क्लिक करुन मिळवा .  SANSKRIT 2003  हा omkaranand ashram या वर उपलब्ध आहे,  APARAJITA,  ARIAL UNICODE MS हे वरील ime मध्येच येतात  ,
अधिक फॉन्ट हवे असतील http://ildc.in   वेबसाईट वरील UNICODE  TYPING TOOL DOWNLOAD करा.
३)ISM6.2  वापरत असाल तर त्यात आपणाला DVOT-SUREKH ,  DVOT-YOGESH व DVOT-SUREKHMR, DVOT-YOGRSHMR  हे फॉन्ट उपलब्ध आहेत यातील mr शेवटी असणा-या फॉन्ट मध्ये अंक मराठीतुन दिसतात. सकल मराठी हा महाराष्ट्र शासनाने मुक्त स्वरुपात उपलब्ध करुन दिला फा फॉन्ट सी-डॅक या संस्थेने विकसित केलेला आहे.  ISM 6.2 व युनिकोड वापराचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे याव्दारे आपण ISM 3.4  मधील डाटा ISM 6.2 मध्ये किंवा युनिकोड मध्ये , किंवा कोणत्याही स्वरुपातील ISM मधील फॉन्ट मध्ये convert करु शकतो . त्यासाठी प्रथम ms-word, excel मधील macro enable  करा . STEPS   MENU>EXCEL OPTION>TRUST CENTER> TRUST CENTER SETTING > MACRO SETTING>  ENABLE ALL MACROS  यापद्धतीने  मॅक्रो अ‍ॅनॅबल करा. नंतर EXCEL OPTION >ADD INS > SELECT ISM 6.2 >GO > SELECT ISM & SORT >OK 

४) SHIVAJI 1,3,5  , KRUTI , KIRAN ,ARATI ANJALI ,KF-KIRAN ,ARATI,ANJALI  हे फॉन्ट युनिकोड आधारित नसल्याने आपणाला इतरांना फाईल पाठ्विल्यास त्यांच्याकडे तो फॉन्ट असणे आवश्यक आहे नाहीतर याफाईल त्यांना दिसणार नाहीत . आपणाला kf-kiran  ही kiran ह्या फॉन्टची सुधारीत आवृत्ती आहे. त्याच बरोबर KF-KIRAN  मधील डाटा UNICODE मध्ये convert करणे व युनिकोड मधील kf-kiran मध्ये करण्याची सुविधा खालील वेबसाईटवर convertion facility यात उपलब्ध आहे . यासाठी कॉपी करूनयावेब वर पेस्ट करा , प्रश्नाचे उत्तर लिहा पुढील विंडो मध्ये तुम्हाला कनव्हर्ट झालेले दिसेल ते कॉपी करूनपेस्ट करा.  http://KIRANFONT.COM
=====================================================================
http://GANGAL.COM  यावेबसाईटवरही आपणाला मराठी टायपिगसाठी सॉफ्टवेअर शुभानन गांगल यांनी उपलब्ध करुन दिलेले आहे .

===================================================================== गुगल मराठी टायपिंग सॉफ्टवेअर  --http://www.google.com/inputtools/windows/ ही गुगल मराठीची लिंक असून , मराठीमधून टाईप करता यावे यासाठीचे अनेक पर्याय इंटरनेटवर सापडतात. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन प्रमुख सेवांनीही याकरीता मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे   .  गूगलने प्रत्येकाला स्वतःच्या भाषेत टाईप करता यावे म्हणून काही टूल्स मोफत दिले आहेत. यास ‘गूगल इनपुट टूल्स’ असे म्हणतात. 
गूगल इनपुट टूल्स हे आता आपण आपल्या संगणकावर घेणार आहोत. आपला संगणक विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असणे याकरिता आवश्यक आहे. ‘विंडोजवर गूगल इनपुट टूल्स’ या पानावर जा आणि उजव्या बाजूस जी भाषांची यादी आहे, त्यातूमधून मराठीची निवड करा. गूगलच्या अटी मान्य करुन इनपुट टूल्स आपल्या संगणकावर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन घ्या. 
मराठीमध्ये टाईप
गूगल इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टाईप करा
गूगल इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टाईप करणे हे अगदी सोपे आहे. आपण रोमन लिपीमध्ये ‘marathi’ असे टाईप केलेत, तर समोर आपोआप ‘मराठी’ असे दिसू लागेल. अर्थात मराठीमध्ये अगदी सहजतेने टाईप करता येण्यासाठी थोड्याशा प्रॅक्टिसची गरज ही आहेच. फेसबुकवर एखादी प्रतिक्रिया देताना अथवा मराठी माणसाला ईमेल पाठवत असताना मराठीमधून टाईप करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे आपला सरावही होईल आणि समोरच्याशी आपल्या मातृभाषेत अगदी सहज संवाद साधता येईल. 
गूगल इनपुट टूल्सचा वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जो लँग्वेज बार आहे, तो वापरुन आपणास काही सेंटींग करता येतील. जर आपण गूगल इनपुट टूल्स डाऊनलोड करत असताना एकाहून अधिक भाषा निवडल्या असतील, तर लँग्वेज बारमधून तुम्हाला टाईप करण्याची भाषा बदलता येईल. याशिवाय त्या लँग्वेज बारवर जे कीबोर्डचे चिन्ह दिसत आहे, त्यावर क्लिक केल्यास आपणासमोर एक आभासी मराठी कीबोर्ड येईल. हा कीबोर्ड वापरुन टाईप करणे हे कदाचीत आपल्यासाठी सोयीचे ठरु शकते. 

No comments:

Post a Comment