Parmeshwar Thate: आपल्या कॉप्म्युटरमधील Drive लपवा Without Software

Sunday, 1 May 2016

आपल्या कॉप्म्युटरमधील Drive लपवा Without Software

मी 23 सप्टेंबर 2014 रोजीच्या गुमनाम फोल्डर डॉट कॉम नामक पोस्टमध्ये फोल्डर कसा लपवायचा ते सांगितले. आता त्यापेक्षा पुढील स्टेप्स म्हणजे ड्राईव्ह लपवणे. कॉम्‍प्‍युटर मध्‍ये मजकूर लपविण्‍याचे इंटनरेटवर भरपूर ट्रिक्स उपलब्ध आहेत. त्यात काही सॉप्टवेअर वापरून करतात तर काही सीएमडी कंपाड वापरून करतात असे वेगवेगळे मार्ग वापरून आपला आपला डाटा सुरक्षीत ठेवू शकतो याविषयी बहुतेकांना माहित नसते. अशीच एक ट्रिक्स वापरून तुम्ही कॉम्‍प्‍युटरमधील संपुर्ण ड्राईव्‍ह लपवू शकता.

        खाली दिलेली ट्रिक्स हि विंडोजच्‍या Windows Vista, Win 7 आणि Win 8 मध्‍ये काम करते.
पुढील प्रमाणे कृती करावी –

सर्वात अगोदर My Computer वर जावून राईट क्लिक करून Manage  या बटणावर क्लिक करा. 

तुमच्या समोर अशी विंडो ओपन होईल.

 आता तुमच्यासमोर  Computer Management ची अशाी विंडो ओपन होईल. समोर विंडोमध्ये स्टोरेज सिलेक्ट करून Disk Management वर क्लिक करावे.

येथे डाव्‍या बाजूला तुमच्या कॉम्पयुटर मध्ये असलेले सर्व ड्राईव्‍ह तुम्हाला दिसतील.
आता तुम्हाला जो ड्राईव्ह लपवायचा असेल त्यावर राईट क्लिक करुन Change Drive Letters and Path या पर्यायावर क्लिक करावे.

    आता समोर एक लहान विंडो दिसेल, यातील Remove या बटनावर क्लिक करा व नंतर Yes या बटनावर क्लिक करा.     आता My Computer मध्ये या तुम्‍हाला तुमचा ड्राईव्‍ह हाईड झालेला दिसेल.

हाच ड्राईव्ह पुन्हा आणायचा असेल तर काय कराल.

      वर केलेली पूर्ण प्रोसेस Change Drive Letters and Path पर्यंत करा त्यांनतर नंतर Add या बटनावर क्लिक करुन हवे ते अक्षर या ड्राईव्‍ह साठी दया. व नंतर Ok या बटनावर क्लिक करावे. तुम्‍हाला तुमचा ड्राईव्‍ह पूर्वीसारखा आलेला दिसेल पुन्‍हा दिसेल.
      ही ट्रिक्स वापरतांना कोणत्याही प्रकारचा डाटा डिलीट होण्याची शक्यता नसते. म्हणून आपल्या कॉप्म्युटरमधील डाटा सेफ ठेवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता.


No comments:

Post a Comment