Thursday, 18 August 2016

जीमेलवर करा स्मार्ट रिप्लाय !

    
आजच्या आधुनिक युगात प्रत्येकजण ईमेल वापरतो. परंतु कामाच्या व्यापामुळे बर्‍याच जणांकडे ई मेल चेक करणे जमत नाही.  म्हणून ईमेल कडून चांगली सुविधा आपल्या ग्राहकांना प्रदान करण्यात आली आहे
   जीमेलवर आता तातडीने आपोआप उत्तर देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्मार्ट रिप्लाय’ या नावाने ही सुविधा देण्यात आली आहे.
    जीमेल तसेच अन्य कोणत्याही अकाऊंटवर आपल्याला ई-मेल आल्यास याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला स्वत: मेल टाईप करून तो पाठवावा लागतो. मात्र जर कोणत्याही मेलचे आपोआप उत्तर देण्याची सुविधा मिळाल्यास धमाल होऊ शकते. आपल्याला ही बाब अशक्य कोटीतील वाटत असली तरी आता जीमेलवर स्मार्ट रिप्लाय नावाने ही सुविधा मिळणार आहे.

        काही ई-मेल्सला तातडीने उत्तर देणे आवश्यक असते. सद्यस्थितीत समोरील व्यक्तीला मेल मिळाल्याचे आपल्याला समजू शकते. मात्र त्याच्या मेलला या नवीन प्रणालीमुळे उत्तर देणे शक्य होणार आहे. सध्या तरी स्मार्ट रिप्लाय प्रणालीत तीन पर्यायांमध्ये संक्षिप्त उत्तर देणे शक्य आहे. मात्र भविष्यात याच्या मदतीने अधिक उत्तम रितीने उत्तर देता येणार आहे.

No comments:

Post a Comment