Monday, 5 September 2016

गणित शिका आता व्हिडीओ पाहून पाहून


         बहुतेक जणांना गणिताची भिती पहिली पाहून ते आतापर्यंत वाटत आली आहे. शाळेत असतांना गणिताच्या शिक्षकांचा मार खाल्ला नाही असे बोटावर मोजण्या इतके विदयार्थी सोडले तर कुणीही नसेल असे मला तरी वाटते. आणि गावाकडील जिल्हा परिषद शाळेतील विदयाथ्र्यांची तर बिकट अवस्था होती. आता फार सुधारणा झाली आहे. बरेच जण आता स्पर्धा परिक्षा देतात ज्यांना स्पर्धा परिक्षांकडे जायचे आहे त्यांना सुरूवातीपासून गणित शिकावे लागते. आणि बहुतेक ठिकाणी गणित सुरूवातीपासून शक्यतो शिकवत नाही. अशांसाठी मी खाली दिलेली वेबसाईट खरोखरच वरदान ठरेल असे मला तरी वाटते.

         गणितातल्या गंमती / युक्त्या, तोंडी गणित, चूक कुठे होते? भूमिती, विभाज्यता, अवयव, लसावि, मसावि, अपूर्णांक, दशांश अपूर्णांक शेकडेवारी (टक्केवारी), बीजगणित, गुणोत्तर आणि प्रमाण, वर्ग, वर्गमूळ, घन, घातांक, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, ऋण संख्या अशा विविध प्रकारात हे हिव्डीओ विभागले गेले आहेत.
  
       या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

1 comment: