Saturday, 15 October 2016

आता देवनागरीतही बनवता येणार ईमेल आयडी

आजपर्यंत आपण ईमेल आयडी हा फक्त इंग्रजी भाषेतच  पाहिला असेल परंतु आता भविष्यात आता युनिकोड फॉरमेटमधेही बन​वता येणार आहे. यापुढे आतापर्यंत आपण अनेक दिवसांच्या चर्चा, अफवा आणि बातम्यानंतर अखेर खरोखरच देवनागरीत ई-मेल आयडी सुरू करण्याची सोय डेटामेल या कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. म्हणून परमेश्वरथाटे@डेटामेल.भारत या प्रकारचा ईमेल आयडी दिसला तर आश्चर्य वाटू देवू नका.
        डेटामेलच्या या तंत्रज्ञानामुळे मराठीसह १२ भाषांमध्ये ई-मेल आयडी तयार करता येतील. त्यामुळे इंग्रजीची भीती असणाऱ्यांनाही सहज इंटरनेट वापरता येऊ शकेल.
        ई-मेल आयडी म्हटलं की, डोळ्यासमोर इंग्रजी अक्षरं @ आणि डॉक कॉम किंवा डॉट इन दिसतं. मात्र आता हेच ई-मेल आयडी मराठीसह हिंदी, गुजराती, तेलुगू, उर्दू, पंजाबी, तामीळ, बंगाली या भारतीय तसेच इंग्रजी, चायनिज, रशियन आणि अरेबिक या परदेशी भाषांमध्ये तयार करता येणार आहेत. हवे त्या स्थानिक भाषेत नाव आणि पुढे त्याच भाषेत @datamail.bharat असा पूर्णपणे 'देसी लुक'चा हा ई-मेल आयडी असेल. डेटा एक्सजेन टेक्नोलॉजी या कंपनीने लॉन्च केलेले डेटामेल अॅप डाऊनलोड करून स्थानिक भाषेत ई-मेल अकाउण्ट सुरू करता येईल, असे डेटामेलचे संस्थापक अजय दाता यांनी सांगितले. अॅप डाउनलोड करून फोन नंबर दिल्यानंतर ओटीपी मिळेल आणि तो क्रमांक कन्फर्म करून अकाउण्ट सुरू करता येते. सध्या १२ भाषांमध्ये लॉन्च केलेल्या या सेवेमध्ये आणखी १० स्थानिक भाषांचा समावेश करण्याचा कंपनीचा मानस आहे.
  
कंपनीने अॅण्ड्राइड अॅप्लिकेशनही उपलब्ध करून दिले आहे.

अॅण्ड्राइड प्ले स्टोअरवरील लिंक - https://goo.gl/TyeeyR

आय स्टोअर लिंक - https://goo.gl/EuFknz

No comments:

Post a Comment