Parmeshwar Thate: स्नॅपडील देणार आता वॉलेट ऑन डिलीव्हरी’ सेवा

Sunday, 20 November 2016

स्नॅपडील देणार आता वॉलेट ऑन डिलीव्हरी’ सेवा


केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्याचा ई-कॉमर्स क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. ऑनलाईन व्यवहारावर ग्राहक जास्तीत जास्त भर देत आहेत. बरेचसे ग्राहक ऑनलाईन वॉलेट वापरून पेमेंटचा मार्ग स्विकारत आहेत. यात पेटीएम, फ्रिचार्ज सारख्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचा वापर ग्राहक मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहेत. यातच स्नॅपडीलने  एक पाऊल पुढे  टाकले आहे. 
         स्नॅपडील कंपनी ही ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील नामांकित कंपनीपैकी एक आहे. एकमेकांना शह देण्यासाठी ऑनलाईन कंपन्या आपल्या ग्राहकांना नवनवीन सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करीत असतात. यामध्येच एक पाऊल पुढे टाकत स्नॅपडीलने आता आपल्या ग्राहकांना कॅशन डिलीव्हरीच्याही पुढे वॉलेट ऑन डिलीव्हरी ही सेवा प्रणाली प्रदान केली आहे.  नोटबंदीला पर्याय व व्यवहार सुरळीत व सोपे व्हावे म्हणून स्नॅपडील कंपनीने यातून मार्ग काढत वॉलेट ऑन डिलीव्हरी’ ही प्रणाली अंमलात आणण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत स्नॅपडीलचीच मालकी असणार्‍या फ्रिचार्ज’ या वॅलेटची मदत घेण्यात आली आहे. या अंतर्गत ग्राहकाला वस्तू मिळाल्यानंतर त्याने फ्रिचार्ज’च्या मदतीने पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment