Wednesday, 1 February 2017

इयत्ता १ ली ते ८ वी ची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके PDF फारमॅटमध्ये

   
    वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवरील शिक्षणाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. जितकी मोठी शाळा तितके मोठे दप्तर असे समीकरण आजच्या काळात झाले असल्याचे दिसते. वयाला न पेलणार्‍या वजनापेक्षाही दप्तर जड झाले आहे. दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांसह येणार्‍या काळात पालकांसाठीही संकट बनू पाहत आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातो की दप्तराचा भार वाहण्यासाठी हे कोडे सोडणविण्यासाठी शिक्षकांनी पुढकार घ्यायला पाहिजे. 
       असाच एक उपक्रम मी आज आपणासमोर शेअर करणार आहे. याच फायदा निश्‍चितच शालेय विद्यार्थ्यांना तर होईलच परंतु जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतात त्यांना सर्व माध्यमांची सर्व पुस्तके १  ली ते ८ वी पर्यंत येथे सहज मिळतील.
         मोबाईलमुळे महाविदयालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनीच नाहीतर शालेय विद्यार्थीही ' हम भी किससे कम नही' म्हणून आपले अस्तित्व सिध्द करू पाहत आहेत. जसा मोबाईलचा फायदा तसा त्यांचा तोटाही आहे परंतु त्याचा वापर कसा करावा याच्यावर ते अवलंबून आहे. 
       

याच मोबाईलचा आधार घेवून मी विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांची व सर्व विषयांची तसेच २००६ पासूनच्या ते आतापर्यंतच्या सर्व विषयाची पुस्तेक पीडीएफ फारमॅटमध्ये आज इथे उपलब्ध करून देत आहे. हे पुस्तके डाउनलोड करून लहान मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करून ई लर्निंगकडे कल वाढावा म्हणून राज्य शासनाच्या बालभारतीच्या वेबसाईटवरून ही पुस्तके डाउनलोड करण्यासाठी लिंक  शेअर करत आहे.  पुस्तके डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


No comments:

Post a Comment