Thursday, 28 September 2017

भारतात रक्तदानासाठी फेसबुकचे नवे फिचर


    भारतात नेहमीच मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा असतो. अनेक रूग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनदेखील फारसा सकारात्मक परिणाम झालेला नसल्याची बाब उघड आहे. या पार्श्‍वभूमिवर रक्तदानासाठी फेसबुकने भारतात नवीन फिचर लॉन्च करणार आहे. यात  आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी रक्ताची गरज असेल तर हमखास फेसबुक पोस्टचा वापर करून व्यक्ती लोकांना रक्तदानासाठी आवाहन करताना दिसतील. रक्तदात्यांशी संपर्क करण्याची हीच गरज आणि वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन फेसबुकनं एक खास फिचर लॉन्च केले आहे याची अमंलबजावणी राष्ट्रीय रक्तदान दिनापासून  होणार आहे. एकप्रकारे रक्तदाते आणि रूग्णांना या माध्यमातून जोडण्याचे काम फेसबुकचे हे फिचर करणार आहे.


 या संदर्भात एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  याच्या अंतर्गत देशातील प्रत्येक युजरला रक्तदाते म्हणून नोंदणी करण्याचे (साईन अप) सूचित करण्यात येणार आहे. यात संबंधीत युजरच्या नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह त्याच्या रक्तगटाची माहिती विचारण्यात येणार आहे. ही माहिती त्रयस्थ व्यक्तीला देण्यात येणार नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून देशभरातील रक्तदात्यांचा मोठ्या प्रमाणात डाटाबेस तयार केला जाईल. यानंतर कुणालाही रक्त हवे असल्यास तो फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याची मागणी करू शकेल. तसेच विविध ब्लॅड बँक, रूग्णालये आदीदेखील संबंधीत रूग्ण आणि रक्तदाते यांच्या कायम संपर्कात राहू शकतील. यामुळे भारतातील रक्तदानाच्या चळवळीला गती मिळणार असल्याचा आशावाद फेसबुकतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment