Thursday, 1 June 2017

आता आयआयटी किंवा इंजिनीअरिंग नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स, सायन्स विषयाचे व्हिडीओ पाहून घ्या शिक्षण

 मित्रांनो सध्याचे युग इंटरनेट व न्यू मिडियाचे युग आहे जो या प्रवाहात स्वत:ला वाहून घेईल किंवा त्याप्रमाणे चालेल तोच या प्रवाहात टिकेल जो प्रवाहात मिसळणार नाही तो बाहेर फेकला जाईल.
आज शाळाच नव्हे तर आयआयटी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येच नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स कॉलेजांमध्ये एक्स्ट्रा क्लास लावावे लागतात आणी ते सर्वसामान्यांना परवडत नाही.
     गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना आज शिकवणी परवडत नाहीत. महागड्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही.म ग नाराज होणे हे आपल्या कदापि मनात ठेवू नका. आज हजारो लोक आपल्या सेवेसाठी तयार आहेत. त्यांची सेवा स्विकारण्याची तयारी ठेवा. उत्तम शिक्षकांचे अध्यापन रेकोर्ड करुन आज हजारो विद्यार्थ्यांनी युट्यूब वर टाकले आहे. ते व्हिडीओ पाहून तुम्हीही शिकू शकताण्
       एखाद्या प्रसिद्ध लेक्चररचं लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर सहज बघायला मिळू शकतं. केवळ आयआयटी किंवा इंजिनीअरिंग कॉलेजांमध्येच नव्हे तर आर्टस-सायन्स-कॉमर्स कॉलेजांमध्येही, त्यांची विशिष्ट लेक्चर्स यूट्यूबवर टाकली जातात. त्यामुळे ती बघण्याची संधी अनेक विद्यार्थ्यांना मिळतेय. अनेक कॉलेजं हळूहळू हा फंडा राबवताना दिसत आहेत.याशिवाय आता पर्याय राहिला नाही. प्रत्येक महाविद्यालयाने वेगळे फ़ंडे वापरणे महत्वाचे आहे.

        पाश्चिमात्य देशांमध्ये वेब आणि व्हिडीओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. जॉब करणाऱ्या किंवा नियमितपणे कॉलेजला न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो. व्हर्चुअल क्लासरूममुळे त्यांना मिस झालेली लेक्चर्स ऐकता येतात. हा ट्रेंड भारतातही दिसून येत असून आयआयटी आणि कित्येक इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये व्हिडीओजच्या माध्यमातून शिकवलं जातं.यामुळे श्रवण आणि द्रुश्य या बाबी मुळे अभ्यास पक्का होतो. अशा काही व्हिडीओचे एक चॅनल मला सर्च करीत असतांना सापडले मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहचवा व त्यांना आॅनलाईन् शिक्षणचा आनं घेवू या.


या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

No comments:

Post a Comment