Wednesday, 28 February 2018

हि कंपनी देणार अनलिमिटेड इंटरनेट व व्हाईस कॉलिंग फ्री


      एयरटेल, जिओ या कंपन्यामध्ये सुरु असलेले दाटावार सुरूच असून दिवसेंदिवस नविन प्लान लॉंन्च करीत ग्राहकांना आकर्षित करण्याची योजना राबवत आहेत. यातच सरकारी कंपनी असलेली बीएसएनएल व डाटाविंग कंपनीने करार करून १ रुपयात एका दिवसासाठी अनलिमिटेड फ्री देणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु या सर्वाना मागे टाकत मोबाईल सिमकार्ड प्रोव्हाडर कंपनी 'चॅट सिम -२'ने एक धमाकेदार सीम लॉन्च केले आहे. हे सीमकार्ड तुम्हाला अनलिमिटेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

        'चॅट सिम-२'ने हि सुविधा जगातील १६५ देशात लॉन्च डेली असून ग्राहक १६५ देशातील लोकांना संदेश पाठवू शकतात. यासाठी कोणतेही रोमिंग शुल्क आकारले जाणार नाही. बर्सिलोनो येथे होणार्या २६ फेब्रुवारी २०१८ च्या 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८'मध्ये हे सीम सादर केले जाणार आहे. हा मेगा इव्हेंट एक मार्चपर्यंत 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८' सुरु राहणार आहे. यापूर्वीही 'चॅट सिम-२' कंपनीने एक सीम लॉन्च केले होते. तेंव्हा या सीमच्या माध्यमातून फोटो, चलचित्र पाहता व पाठवता येत होते व व्हाईस कॉलिंगकही करता येत होते. परंतु त्यासाठी ग्राहकांना काही मल्टीमिडीया क्रेडिट्स खरेदी करावी लागत असत. आता नव्या सीमबाबत कंपनीने इंटरनेट डाटा सर्फिंग व बाकी मोबाईल अॅप्स वापर करण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे क्रेडीट घ्यावे लागणार नाही.
        कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 'चॅट सिम-२' कंपनी हि जगभरातील १५० टेलिकॉम ऑपरेटरसोबत काम करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही. ज्यांची सेवा हि १६५ हून अधिक देशामध्ये आहे. या सिमसोबत कंपनी काही अॅप देणार आहेत. व्हाट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर, व्ही चॅट, टेलीग्राम, इंन्स्टाग्राम यांचा समावेश आहे. 'चॅट सिम-२' या कंपनीने या सीम कार्डाची किमतीबाबत अद्याप काही खुलासा केलेला नाही. त्यामुळे हे सीम किती रुपयाला व कधी मिळणार याबाबत सर्वच उत्सुक आहेत.

No comments:

Post a Comment