Friday, 2 March 2018

रिलायन्स बिग टिव्हीची डीटीएच सेवा चक्क फ्री

       

        सप्टेंबर २०१६ मध्ये जिओने ४ जी सेवा लॉन्च करून संपूर्ण मोबाईल क्षेत्रात एक नवी क्रांतीच घडवून आणली त्या नंतर सर्वच मोबाईल ऑपरेटर कंपन्यामध्ये इंटरनेट सेवा देण्यावरून डाटा वर अद्याप पर्यंत सुरूच आहे. रिलायन्स बिग टिव्हीने बुधवारी डायरेक्‍ट टू होम ( डीटीएच ) सेवा एक वर्षापर्यंत फ्री देण्याची घोषणा केली आहे.
         भारत सरकारने सुरु केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला सपोर्ट देण्यासाठी या सेवेची घोषणा रिलायन्स बिग टिव्हीने केली आहे. सध्या स्मार्टफोन उत्पादक तसेच सेल्युलर कंपन्यामध्ये दरयुद्ध सुरूच आहे. आता हे डीटीएच क्षेत्रातही होणार हे नक्की.
         रिलायंस बीग टिव्हीने फ्री-टू-एयर (सुमारे ५०० ) चॅनेल पाच वर्षा पर्यंत फ्री तर पे चॅनेल ( एच.डी. सहित ) एक वर्षा पर्यंत फ्री देणार असल्याचे सांगितले. सेट टॉप बॉक्स ची प्री बुकिंग ऑफिसियल वेबसाईटवर १ मार्च पासून सुरु झालेली आहे. बुकिंग स्टॉकच्या उपलब्धतेनुसार होणार आहे. या सेट टॉप बॉक्समध्ये शेड्यूल्‍ड रिकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, यूट्यूब और टीवी शो रिकॉर्डिंग असे ऑप्शन देण्यात येणार आहे.

        ग्राहकाना सर्वात चांगल्या दर्जेदार कार्यक्रमाचा अनुभव देण्यासाठी व डिजिटल दर्जा, माफक सेवा एच.डी., एच.व्ही.सी. उपकरणाच्या मदतीने रिलायंस बीग टिव्ही नेटवर्क व्यापक करण्यावर भर दिला आहे. आजवर भारतीयाना आपल्या टिव्ही सेटवर मनोरंजन ज्या पद्धतीने मिळत आहे त्यात बिग टिव्ही अमुलाग्र बदल घडवीत आहे. कंपनीच्या ऑफरमुळेआजपासून टीव्हीवर मनोरंजन प्रभावीरीत्या मोफत प्राप्त होणार आहे.

No comments:

Post a Comment