Parmeshwar Thate: व्हॉटस्अप ने "डिलीट फॉर एव्हरीवन" या सेवेत केला बदल

Sunday, 4 March 2018

व्हॉटस्अप ने "डिलीट फॉर एव्हरीवन" या सेवेत केला बदल

     व्हॉटस्अप ने आपल्या वापरकर्त्यासाठी सतत नवनवीन ऑफर घेऊन येत असते.  असेच काही नवीन फिचर पैकी एक म्हणजे "डिलीट फॉर एव्हरीवन"  या फिचर ची मर्यादा वाढवून  1 तास 8 मिनिटे आणि 16 सेकंदांपर्यंत वाढवली आहे.
या अगोदरही व्हॉटस्अप ने 'व्हॉट्स अॅप पेमेंट' या मोठ्या फिचरला लांच केले होते.  तसेच 'ग्रुप डिस्क्रिप्शन'  हे फिचर हि लांच केले होते. या द्यारे ग्रुप मध्ये चॅटिंग करता येणार शक्य होणार आहे. पूर्वी "डिलीट फॉर एव्हरीवन" या सुविधेची मर्यादा ४२० सेकंद म्हणजेच सात मिनिटांची होती ती आता वाढवून ४०९६ सेकंद म्हणजेच ६८ मिनिटे आणि १६ सेकंद एवढी केली आहे. वाबेटाइन्फो या संकेतस्थळवर सांगितल्या प्रमाणे अॅण्ड्राईड बीटा व्हर्जन २.१८.६.९. साठी आहे. लवकरच हि सुविधा अॅण्ड्राईड व आयओएस व्हर्जन वर उपलब्ध होणार आहे. म्हणजेच फक्त "डिलीट फॉर एव्हरीवन" या सुविधेचा उपयोग फक्त बीटा टेस्टर घेऊ शकतात.
गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये २०१७ मध्ये अॅण्ड्राईड व आयओएस व विंडोज वापरकर्त्यांसाठी सर्वाना "डिलीट फॉर एव्हरीवन" हि सुविधा सुरु केली होती. त्यावेळी याची मर्यादा ७ मिनिटांची होती. यावेळी काही वापरकर्त्याना हि मर्यादा खूपच कमी वाटत होती. आता या सुविधेमुळे एक तासानंतरही आता पाठविलेला संदेश डिलीट करता येणे शक्य होणार आहे.

No comments:

Post a Comment