Friday, 27 April 2018

कामाचे मूल्य आणि शुल्क यातील फरक


एका व्यापारी कामानिमित्त दिल्लीला जात असतो परंतु त्याची गाडी मधेच बंद पडते. त्याच्या गाडीतील ड्रायव्हर व इतर व्यक्ती ती गाडी पाहतात परंतु त्यांना काही समजत नाही कि, गाडीला नेमके झाले काय? मॅकेनिकला बोलावतात पण त्यालाही त्यातील दोष सापडत नाही. तेव्हा ते इंजिनियरला बोलावतात. तो इंजिनियर येतो गाडीची पाहणी करतो आणि इंजिनमध्ये एका ठिकाणी हातोडा मारतो आणि गाडी सुरू होऊन जाते. तो इंजिनियर त्यांच्याकडे १,००० रुपयाचे बिल देतो आणि निघून जातो. त्या व्यापाऱ्याला वाटते काही तरी चूक झाले असेल ते बिल त्यांच्या शोरूम दुरुस्तीसाठी पाठवतात. आणि त्यांना सांगतात कि एक हातोडा मारण्याचे एवढे बिल कसे? ते कमी करा असे सांगतो. त्यावर कन्सल्टंट त्यांना अतिशय सुंदर उत्तर देतात. ते त्यांना सांगतात कि, हातोडा मारण्याचे शुल्क फक्त १ रुपया आहे परंतु तो कोठे मारायचा याचे ९९९ रुपये आहेत.   
यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षत आला असेलच. मी एखाद्याला कन्सल्टिंग करतो तेव्हा त्यासाठी माझी  कन्सल्टिंग आकारतो. त्यावेळी सुद्धा हि समस्या जाणवते. लोकांना वाटत कि दोन तास बोलायचे एवढे शुल्क कशाला. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते त्याच्या ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे.
        आपल्याला आपल्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून १०० रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे १ हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल १० हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली १ लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते. कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी यशाकडे वाटचाल सुरु झालेली असते. 

No comments:

Post a Comment