Sunday, 29 April 2018

माझ्या आयुष्याच्या आठवणीतील आठवणी ...

Danik Bhaskar group, Office Bhopal
आपण एकटे असले कि आपण सहजच विचार करत बसतो. एकसारख कुठेतरी पाहत बसतो आणि नकळत आपण आपल्या जुन्या आठवनींमध्ये हरवून जातो. त्यांना उजाळा देत असतो. त्यात मग आपण लहान मुले पाहिले कि, आपल्याला आपले बालपण आठवते तर एखादे प्रेमीयुगल पहिले कि आठवतात आपले प्रेमाचे दिवस. आयुष्यात आठवणी येतात, आठवणी रडवतात, आठवणी हसवतात, काहीही न बोलता आठवणी निघूनही जातात. तरीही आयुष्यात आठवणीच शिल्लक राहतात याना सांभाळून ठेवायचे असते कारण जेव्हा कुणीही नसतं, तेव्हा आपल्या जवळ उरतात फक्त या आठवणीच. कुणी तरी म्हणून ठेवले आहे ना की.... " गेले ते दिवस राहील्या त्या फक्त आठवणी " ते खरच.
NIOS , Delhi 
थोडक्यात काय तर सगळ्यांच्या आयुष्यात, मनात, ह्रदयात कायम असलेल्या चांगल्या वाईट क्षणांची साक्षीदार म्हणजे आठवण. खरतर हा शब्द कोणालाच अपरिचित नसावा. कारण प्रत्येकाच्या आयुष्याच्या शिजोरीत याला सुरक्षित अस एक वेगळ अन सुंदर स्थान असतं. आयुष्याचा हा प्रवास करत असताना वाटेत अनेक चांगले वाईट अनुभव येतात. काही माणस भेटतात जे आयुष्यातल्या जगण्याची व्याख्या बदलून टाकतात. आणि हेच आयुष्य जगत असताना काही क्षण कायम स्वरूपी स्मरणात राहून जातात. या सगळ्याच रेकॉर्डिंग आपल्या नकळत होत असत आणि हे सगळे टिपलेले क्षण आठवणी नावाच्या सुंदर अशा डिव्हाइस मध्ये जपुन ठेवल्या जातात. ईथे न कसला व्हायरस असतो न याला कोणी फॉरमेट मारु शकतो. या आठवणी मिटतात नष्ट होतात त्या फक्त माणुस नावाचा मोबाईल कायमचा बंद पडला तरच. अलीकडच्या मोबाईलमुळे प्रत्येकजण हवा तो क्षण क्षण कैमरा मध्ये कैद करु शकतो. मग त्यात लग्न, टूर, भेटीगाठी, मित्रासोबतचे फोटो असोत. हे सर्व करीत असणा सुद्धा आपल्या आठवणींचा रेकॉर्डिंग मात्र कायम चालुच असत बरंका. आणि ह्या साठलेल्या आठवणी तुम्हाला हव त्या वेळी हव तेथे तुम्ही पाहु शकता. यांना न कसली रेंज लागते ना कसला चार्जर ना मोबाईल. गरज असते ती फक्त शांत मनाची, शांत वातावरणाची. आणि या आठवणी कधीच ठरवुन आठवता येत नाहीत त्या प्रसंगाला अनुसरुन चटकन येतात. म्हणजे बघा ना समोर एखाद सुंदर जोडप चालल असेल तर जातो ना आपण पण लगेच आठवणीत आपल्या त्या दिवसांच्या किंवा त्या घालवलेल्या क्षणांच्या. ज्यावेळी ज्यावेळी माझा एकांत एकत्र येतो त्यावेळी आम्ही दोघ आठवणींवर खुप बोलतो. मग कधी डोळ्यात पाणी येत तर कधी हसु येत.
दूरदर्शन दिल्ली 
असेच काही क्षण माझ्या आयुष्यात मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यातील आज सोबत आहेत फक्त आठवणी. या काळात जे घडले ते अविस्मरणयचं होते. २००५ मी १२ वी पास झालो नंतर २००५ ते २००७ या कालावधीत मी कृषी पदविका हा दोन वर्षाचा डिप्लोमाला प्रवेश घेतला. हे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस मी येथे घालवले. मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलो तो घरच्यांना सोडून. येथे नवनवीन जीवाभावाचे मित्र भेटले. त्यात नाव घ्यायचेच झाले तर समाधान भालेराव, सेवकराम धांडे, अमोल पाटील, घनशाम चौधरी, प्रवीण नेमाडे, चेतन भंगाळे, उल्हास नेमाडे हे व इतर मित्र व मैत्रीणी. या दोन वर्षात मी खूप आनंदी जीवन जगलो. २००७ साली मी डिप्लोमा पास आऊट झालो आणि जो तो त्याच्या त्याच्या मार्गाला लागले. आणि ते जे गेले आजपर्यत भेटलेच नाही. काही मित्र अपवाद वगळता. ते दोन वर्ष माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिले ते कायमचे
मी माझ्या आयुष्यातील शिक्षणाचा संबंध २००७ नंतर तसा तोडूनच टाकला होता. कारण या वर्षी मी कृषी पदविका हा दोन वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर शिक्षण घ्यायचे नाही असे ठरवून कंपन्यांमध्ये काम करत गेलो व हेच आपले सर्व काही असे समजून चालू लागलो. नवभारत फर्टीलायझरर्स, टपारीया टूल्स, आय.टी.इंटलेक्ट प्रा.लि., यासारख्या कंपन्यामध्ये काम केले आणि कळाले कि, शिक्षणाशियाय पर्याय नाही. परंतु म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही माझे तसेच झाले येथे समजले कि शिक्षणाशिवाय माणसाला किमत नाही. या काळात आम्ही विविध कंपन्यामध्ये नको ते काम केले. म्हणून घरी येऊन शिक्षण करायचे ठरवले व २०११ मध्ये F.Y.B.A. ला अडमिशन घेतली पण पास काढायला पैसे द्यायचे घरचे नाही म्हणायचे म्हणून पैशाच्या अभावी तेथे थांबावे लागले. परंतु २०१३ हे वर्ष माझ्या साठी वेगळेच वळण देणारे ठरले. या काळात मी महिंद्रा हिनोद्य या कंपनीत होतो व याच वर्षी माझे लग्नही झाले.
sunset point, Panchmadhi 
मी कंपनीतून घरी आलो तो कायमचाच. मी घरी आल्यावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अडमिशन घेतली व मी २०१५ ला Graduation पूर्ण केले. याच पिरेड मध्ये मी दैनिक जळगाव माझा वृत्तपत्रात सुरुवातीला डीटीपी ऑपरेटर म्हणून काम केले व नंतर उपसंपादक म्हणून २ वर्ष काम पहिले. याच वेळी म्हणजेच २०१५ ला मला विनोद निताळे सर मला भेटले व त्यांनी मला मास कम्युनिकेशन करण्याचा सल्ला दिला व येथेच माझ्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. मी मू.जे.महाविद्यालयात मास कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. येथे विनोद निताळे सर विभाग प्रमुख होते. त्यांच्यासोबत गोपी सोरडे सर, दिक्षित सर, राजेश यावलकर सर होते. विनोद निताळे सरांनी प्रथम वर्षात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. निताळे सरांनी पत्रकारिता व जनसंवाद हा विषय शिकवला. खासकरून आशय विश्लेषण हा भाग सरांनी इतका व्यवस्थित शिकवला कि तो मला दुसऱ्या वर्षाला असताना मला परत कामी आले. तसेच सोरडे सरांनी Law and Ethics हा विषय खूपचं छान शिकवला. तसेच यावलकर व दीक्षित सरांनीही मोलाचे मार्गदर्शन केले हे निश्चित. या वर्षी मी सर्व विद्यार्थ्यांसोबत दिल्लीला गेलो. तेथे ताजमहल, लाल किल्ला, राष्ट्रपतीभवन, NIOS, चांदणी चौक पाहता आले. एप्रिल २०१७ ला पहिले वर्ष सुटलो. निकाल समाधानकारक लागला.
आता दुसऱ्या वर्षाला प्रवेश घ्यायचा होता परंतु अडमिशन घ्यायला पैसे नव्हते. भरपूर दिवस पैसे बघितले परंतु कुणी पैशाची मदत केली नाही. शेवटी यावेळी माझ्या पत्नीने मला गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले व मी ते मोडून दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला व ठरवले कि याचे आपण चीज करायचेचं. आणि मी ते करणार यात शंकाही नव्हती. यावेळी निताळे सरांची बदली झाली होती. यावेळी आम्हाला नवीन सर येणार होते ते कसे असतील काय शिकवतील काही माहित नव्हते परंतु आमचे नशीब चांगले आणि आम्हाला मीडिया क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले थोडक्यात या क्षेत्रातील बाप माणसं भेटलीत ते म्हणजे दिलीप तिवारी सर. सरांना सकाळ व तरुण भारत या अग्रगण्य दैनिकाच्या संपादक पदाचा २७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव होता.
सरांकडे न्यू मीडिया हा विषय होता तो विषय त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतिने शिकवला कारण ते त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करत होते. सरांनी आम्हाला भरपूर ज्ञान दिले. व न्यू मीडिया काय असतो ते शिकवले व प्रत्येक गोष्ट हि प्रात्यक्षिकद्यारे करून दाखवली. या स्पर्धेच्या युगात जर टिकायचे असेल तर आपण स्वतःला कसे बदलले पाहिजे व घडवले पाहिजे हे शिकवले. यासाठी सरांनी आम्हाला भोपाळ येथील वेबदुनिया, दैनिक भास्कर समूह, राष्ट्रीय पत्रकारिता विश्व विद्यालय भोपाळ येथे नेवून येथील काम कसे चालते हे दाखवले. मी आज जे काही लिहिले ते दिलीप तिवारी सरामुळेचं. कारण मी सरांचे ब्लॉग वाचून कसे लिहायचे ते शिकलो. व मी आज छोटासा प्रयत्न करुन पहिला. तसेच विभाग प्रमुख म्हणून विश्वजित चौधरी सर आम्हाला लाभले होते. त्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र टाईम्सचे प्रवीण चौधरी सर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच प्रशांत सोनवणे जे आमचे सिनियर होते तेच आम्हाला शिक्षक म्हणून लाभले त्यांनीही काही अडचणी असल्यास त्या सोडवण्यास मदत केली.  
राष्ट्रीय पत्रकारिता विश्व विद्यालय, भोपाल 
याच काळात मला आणखी नवीन जीवाभावाचे मित्र मैत्रिणी मिळाल्या. राजेश चान्देलकर, सागर बाविस्कर, हर्षल सोनार, रितेश कुंटे, राजेंद्र देवरे, गोपाल मराठे, प्रसाद कुलकर्णी, सुकलाल सुरवाडे, संदीप माळी, रंजना अडकमोल, ज्योती अडकमोल, सुजाता बागुल यांच्या सोबत घालवलेल्या आठवणी कायम स्मरणात राहतील. यांचेही माझ्या २००७ च्या मित्रांसारखेच होणार आहे हे मला माहित आहे. या नंतर जो तो त्याच्या त्याच्या कामाला लागणार हे निश्चित. कारण त्यासाठीच आपण यामहाविद्यालयात शिक्षण घ्यायला आलो होतो. आणि आपले शिक्षण हि तसेच होते. दमदार. वजनदार, प्रात्याक्षिकावर भर देणारे. आता यात शिक्षण आणि ज्ञान कुणी, कुठे, कसे, काय आणि कधी म्हणजेच सहा ‘क – कार’ प्रमाणे ग्रहण केले देव जाने. सर्वाना भावी आयुष्यासाठी, नोकरीसाठी, कुणाला छोकरीसाठी हार्दिक सदिच्छा.
National Institute of open university 


कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)

कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)

कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)
कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)
कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)

कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)
कृषी डिप्लोमा, निंभोरा ता. रावेर  (वर्ष -2006-2007)

No comments:

Post a Comment