Monday, 30 April 2018

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन

     महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान, महाराष्ट्र म्हणजे लढाऊ बाणा, शिवरायांच्या लढा. इंद्रायणी अथंग, तुकयाचे अभंग, मराठमोळी दौलत जारी पंढरीची अविरतवारी, मराठमोळे गंधर्वजान आणि ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान. भारतीय स्वातंत्र लढ्यात महाराष्ट्रातील शूरवीरांनी आपली भूमिका साकारली आहे. महाराष्ट्रातील अनेक देशभक्त, क्रांतिकारक देश व राज्य स्वतंत्र करण्यासाठी धडपडले. या हुतात्म्यांच्या बलीदानामुळेच आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो आहे.
      महाराष्ट्र भूमी हि संताची, शूरवीरांची आणि पराक्रमाची म्हणून ओळखली जाते. या स्वतंत्र महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले व १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. या निमित्त महाराष्ट्राच्या इतिहासावर टाकलेला छोटासा प्रकाश.
     पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. या स्वातंत्र प्राप्तीनंतर भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा उपस्थित झाला. एस.के.दार यांचे कमिशन नेमले गेले परंतु त्यांनी भाषावार प्रांतरचना हि देशाची एकात्मितेला घात करणारी आहे असा अभिप्राय दिला. यावेळी मुंबई हा कळीचा मुद्दा होता याच काळात मुंबईची औद्योगिक प्रगती वेगाने सुरु होती म्हणूनच मुंबईतील भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी मुंबईवरील आपली पकड कायम ठेऊ पाहत होते. मुंबई हे शहर चहूबाजूनी महाराष्ट्राच्या भूभागानी वेढलेले होते. ते वेगळे करणे त्यांना अशक्य होते. पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सीतारामय्या यांची जे.व्ही.पी.समिती नेमण्यात आली. जे.व्ही.पी. समितीनेही महाराष्ट्र स्वतंत्र जरी झाला तरी मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार नाही असा निर्णय दिला. यामुळे राज्यातील मराठी जनता पेटून उठली.
     डिसेंबर १९५३ मध्ये केंद्र सरकारने पुन्हा एकदा भाषावार प्रांत रचनेसाठी निवृत्त न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली. व महाराष्ट्र व गुजरात हे दोन राज्य वगळून इतर राज्यांना स्वतंत्र राज्य देण्यात आली. यामुळे आपल्यावर जाणून बुजून अन्याय होतो आहे असे महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागले या भावनेने मराठी माणसे संतप्त झाले व पेटून उठली. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच.
       जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना  तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. या गोळीबारात १०५ हुतात्म्यांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. या स्वतंत्र राज्याचे पहिले 
 मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे ठरले.

महाराष्ट्रासाठी शहीद झालेले १०५ हुतात्मे :-1. सिताराम बनाजी पवार
2. जोसेफ डेव्हिड पेजारकर
3. चिमणलाल डी. शेठ
4. भास्कर नारायण कामतेकर
5. रामचंद्र सेवाराम
6. शंकर खोटे
7. धर्माजी गंगाराम नागवेकर
8. रामचंद्र लक्ष्मण जाधव
9. के. जे. झेवियर
10. पी. एस. जॉन
11. शरद जी. वाणी
12. वेदीसिंग
13. रामचंद्र भाटीया
14. गंगाराम गुणाजी
15. गजानन ऊर्फ बंडू गोखले
16. निवृत्ती विठोबा मोरे
17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
18. बालप्पा मुतण्णा कामाठी
19. धोंडू लक्ष्मण पारडूले
20. भाऊ सखाराम कदम
21. यशवंत बाबाजी भगत
22. गोविंद बाबूराव जोगल
23. पांडूरंग धोंडू धाडवे
24. गोपाळ चिमाजी कोरडे
25. पांडूरंग बाबाजी जाधव
26. बाबू हरी दाते
27. अनुप माहावीर
28. विनायक पांचाळ
29. सिताराम गणपत म्हादे
30. सुभाष भिवा बोरकर
31. गणपत रामा तानकर
32. सिताराम गयादीन
33. गोरखनाथ रावजी जगताप
34. महमद अली
35. तुळशीराम पुंजाजी बेलसरे
36. देवाजी सखाराम पाटील
37. शामलाल जेठानंद
38. सदाशिव महादेव भोसले
39. भिकाजी पांडूरंग रंगाटे
40. वासुदेव सुर्याजी मांजरेकर
41. भिकाजी बाबू बांबरकर
42. सखाराम श्रीपत ढमाले
43. नरेंद्र नारायण प्रधान
44. शंकर गोपाल कुष्टे
45. दत्ताराम कृष्णा सावंत
46. बबन बापू भरगुडे
47. विष्णू सखाराम बने
48. सिताराम धोंडू राडये
49. तुकाराम धोंडू शिंदे
50. विठ्ठल गंगाराम मोरे
51. रामा लखन विंदा
52. एडवीन आमब्रोझ साळवी
53. बाबा महादू सावंत
54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर
55. विठ्ठल दौलत साळुंखे
56. रामनाथ पांडूरंग अमृते
57. परशुराम अंबाजी देसाई
58. घनश्याम बाबू कोलार
59. धोंडू रामकृष्ण सुतार
60. मुनीमजी बलदेव पांडे
61. मारुती विठोबा म्हस्के
62. भाऊ कोंडीबा भास्कर
63. धोंडो राघो पुजारी
64. ह्रुदयसिंग दारजेसिंग
65. पांडू माहादू अवरीरकर
66. शंकर विठोबा राणे
67. विजयकुमार सदाशिव भडेकर
68. कृष्णाजी गणू शिंदे
69. रामचंद्र विठ्ठल चौगुले
70. धोंडू भागू जाधव
71. रघुनाथ सखाराम बीनगुडे
72. काशीनाथ गोविंद चिंदरकर
73. करपैया किरमल देवेंद्र
74. चुलाराम मुंबराज
75. बालमोहन
76. अनंता
77. गंगाराम विष्णू गुरव
78. रत्नु गोंदिवरे
79. सय्यद कासम
80. भिकाजी दाजी
81. अनंत गोलतकर
82. किसन वीरकर
83. सुखलाल रामलाल बंसकर
84. पांडूरंग विष्णू वाळके
85. फुलवरी मगरु
86. गुलाब कृष्णा खवळे
87. बाबूराव देवदास पाटील
88. लक्ष्मण नरहरी थोरात
89. ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
90. गणपत रामा भुते
91. मुनशी वझीऱअली
92. दौलतराम मथुरादास
93. विठ्ठल नारायण चव्हाण
94. देवजी शिवन राठोड
95. रावजीभाई डोसाभाई पटेल
96. होरमसजी करसेटजी
97. गिरधर हेमचंद लोहार
98. सत्तू खंडू वाईकर
99. गणपत श्रीधर जोशी
100. माधव राजाराम तुरे(बेलदार)
101. मारुती बेन्नाळकर
102. मधूकर बापू बांदेकर
103. लक्ष्मण गोविंद गावडे
104. महादेव बारीगडी
105. कमलाबाई मोहित

" या महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांस कोटी कोटी वंदन"
शेवटी कवी सुरेश भटांची कविता आठवते तीच सांगेन,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो
मराठी कामगार दिन कसा सुरू झाला?
      युरोपात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १ मे १८९१ पासून हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा. 
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख मागण्या होत्या
भारतातील पहिला कामगार दिन :-
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला.

No comments:

Post a Comment