Friday, 3 May 2019

मोबाइल मध्ये नंबर न सेव करता करा whatsapp वर मेसेज

     आज व्हाटसॲपवर माहीत नाही असा माणूस सापडणे अवघड आहे. सर्वात वेगाने याचा प्रचार व प्रसार झाला आहे याची सुरवात 2009 मध्ये लागला  व 2014 मध्ये त्याची मालकी फेसबुकने घेतली. कारण फेसबुकने हे विकत घेतले  कारण त्यांनी याचा भविष्यातील वेध घेतला होता. आज  व्हाटसॲप जगात न. 1 चे मेसेंजर आहे
     आज शालेय विद्यार्थ्यापासून ते वयस्क व्यक्ति पर्यन्त सर्वच याचा वापर करत असतात. संदेशाची देवाण घेवाण यामुळे सहज सोपी झाली आहे. ही संदेशाची देवाण घेवाण करण्यासाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नंबर आपल्या मोबाइल मध्ये सेव करावा लागतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचा कामांमध्ये अनेकदा एखाद्या नवीन व्यक्तीला आपल्याला एकदाच मेसेज करायचा असतो. फक्त एका मेसेजसाठी नंबर सेव केल्याने अनावश्यक कॉन्टॅक्टस फोनबुकमध्ये सेव्ह लागतात. पण नंबर सेव नसेल तर सेव करण्यात वेळ जातो परंतु आपण त्या व्यक्तीचा नंबर सेव न करता आपण त्याला मेसेज करू शकतो. तर हे कसे करायचे हे आपण या व्हिडिओत  जाणून घेणार आहोत.
1.  आपल्या मोबाइल मध्ये कोणतेही ब्राउझर उघडा. जसे की गुगल क्रोम, मोझीला, सफारी, ओपेरा
2.      यात https://wa.me/<number> अशी लिंक तयार करा. <number> च्या जागी तुम्हाला ज्याला मेसेज करायचा आहे त्याचा नंबर टाका. नंबर इंटरनॅशल फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे. जसे की +91 पासून सुरू होणारा
असा असावा Use  : https://wa.me/919637822513
असा नसावा Don't use  : https://wa.me/9637822513 किंवा https://wa.me/+91-9637822513
            हि लिंक उघडल्यावर तुमच्यासमोर एक पेज ओपेन होईल.
   या स्कीनशॉट प्रमाणे

        यात Open this page in WhatsApp? असा मेसेज दिसेल. यानंतर Open वर क्लिक केल्यावर तुमच्या व्हाटसॲपमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या नंबरची चॅट उघडेल. यानंतर तुम्हाला हवा तो मेसेज पाठवा आणि चॅट सुरु करा.

No comments:

Post a Comment