Parmeshwar Thate: गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

Tuesday, 16 July 2019

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी२००५ ला मी कृषी पदविका या दोन वर्षीय  अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. तेव्हा पहिल्यांदाच मी घर सोडून बाहेर राहणार होतो. सर्व कोण असतील कसे असतील काही माहित नव्हते परंतु  २००५-०७ याकालावधीत अनेक जीवाभावाचे मित्र भेटले. आम्ही पूर्ण वर्गात ६० मुले व मुली होतो. २००७ ला कृषी पदविका पासआऊट झाल्यानंतर मला कुणीही भेटले नाही. कुणी पुढील शिक्षणासाठी, तर कुणी नोकरीसाठी तर कुणी व्यवसायासाठी एतस्तत: विखुरलो गेलो. त्या वर्षातील आठवणी मनात घर करून गेल्या त्या कायमच्याच. मित्रांसोबत घालवलेले ते क्षण आठवण्या पुरतेच मर्यादित होते. पण ते दिवस थोड्या फरकाने का होईना पण परत अनुभवयाला मिळतील का हा विचार मनात  कायम घुटमळत होता.  
२४ फेब्रुवारी २०१९ ला मी लंच ब्रेक असल्याने जेवण झाल्यावर सहजच फेसबुक चालत बसलो होतोतो समोर उल्हास नेमाडे हे नाव आले मी लगेचच त्या नावावर क्लिक केले असता उल्हास चा फोटो आला मी त्याला लगेच ओळखले. त्याने नाशिकला असल्याचे सांगितले आणि बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या मी त्याला म्हटले काही कुणी संपर्कात आहे त्यावर तो म्हणाला आपला कृषीचा व्हाट्सअप गृप आहे. त्याने मला लगेच ग्रुप मध्ये करायला सांगितले. व हर्षले धांडेने मला २८ मार्च २०१९ ला ग्रुप मध्ये  करून घेतले. १२ वर्षानंतर मी मित्रांच्या संपर्कात आलो होतो मला जुने दिवस आठवू लागले. व आठवणीना नवी पालवी फुटू लागली. सुरुवातीला या ग्रुपमध्ये  कमी मेम्बर होते परंतु जसे जसे मित्र एड होत गेले तसतसा संपर्क वाढत गेला. बरच दिवस गप्पा रंगू लागल्या . सर्वाना एकमेकाच्या भेटीची उत्सुकता लागली होती आणि सर्वांनी भेटायचे ठरवले व तब्बल १ महिन्यानंतर सर्वांच्या विचार विनिमयाने ठिकाण  व वेळ ठरली. वेळ होती दि. १४ जुलै  २०१९  व ठिकाण होते जेथे आमचे शिक्षण  पूर्ण झाले ते कृषी विद्यालय निंभोरा. या ठिकाणी आम्ही २ वर्ष सोबत घालवलेले होते.   या ठिकाणी शिक्षणासाठी आम्ही एकूण मुले व मुली मिळून ६० होतो. परंतु ग्रुपला आम्ही ४६ मेंबर आहोत परंतु भेटण्यासाठी यायला फक्त २० च तयार झाले. बऱ्याच जणांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे तर काही जणांना त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे येता आले नाही.  सेवकराम धांडे, हर्शल धांडे, अमित धांडे, तुषार जावळे, गोपाल पाटील, नबी तडवी,  अमोल पाटील, योगेश महाले, प्रकाश गाढेकर, घनश्याम चौधरी, चंदू जावळे, भरत मोरे, समाधान भिल्ल, समाधान भालेराव, पंकज पाटील,  अमोल गिरडे, निलेश लोखंडे, संदीप तायडे, संतोष तायडे, विकुल महाजन व  मी परमेश्वर थाटे  इत्यादी मित्र एकत्र आलो.
१४ जुलै ला आम्ही एक तपानंतर एकत्र भेटणार होतो. कुणाच्या शरीर यष्टीत बदल झालेला असेल का ? ते ओळखु येतील का ?  कुणी कसे दिसत असेल अशा शंका मनात निर्माण होत होत्या व भेटल्यानंतर लगेचच सर्व प्रश्नाचे निरसन झाले. थोड्या बहुत फरकाने सर्वामध्ये बदल झालेला होता.  भेटल्यानंतर सर्वच जुन्या आठवणीत  रममाण झाले. प्रत्येक जन जुन्या आठवणीना उजाळा  देत होता. व आपल्या मनातील आठवणीचा कप्पा उघडत होता. व घडलेल्या  गमती जमती सांगत होता. यावेळी मनसोक्त व दिलखुलास हसलो व वाटत होते  कि ते दिवस पुन्हा आपल्या जीवनात परत यायला हवे.  परंतु ते शक्य नव्हते.  कारण गेलेली वेळ कधीही परत येत नाही.  मित्रांसोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणांचा हेवा वाटत होता. खूप वर्षांनी जणू झाडाला नवी पालवी फुटलेली होती.     

 आम्ही ज्या वर्गात शिक्षण ग्रहण केले होते त्या वर्गातील आम्ही ज्या बाकावर बसलो होतो ते बाक अजूनही तसेच होते. व आम्ही त्या बाकावर बसून जुने दिवस आठवू लागलो व सर्वांनी फोटो हि काढले व जुन्या आठवणींना उजाळा देत होतो.

बऱ्याच वेळा गप्पा मारल्यानंतर दुपारी मस्त पैकी जेवणाचा बेत होता त्या जेवणाच्या मेनूत फौजदारी दाळ व पोळ्या हा मस्त आयटम होता. याचे सर्व नियोजन आमच्यातील ज्येष्ठ व श्रेष्ठ मित्र व पाल येथे अध्यापनाचे पवित्र काम करनारे सेवकरामभाऊ धांडे   यांनी केलेले होते. दुपारी १.३० वाजता मनसोक्त जेवणाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा जुन्या आठवणीत रममान झालो.  हि वेळ सरू नये असे प्रत्येकाला वाटत होते.  हि उत्सुकता इथेच न संपवता पुढील भेटीच आम्ही नियोजन केले व त्याची तारीखही ठरली . ३० ऑक्टोबर २०१९ ला आज जे आले नाहीत  त्या सर्वाना घेऊन परत भेटायचे असे ठरवून  व मन घट्ट करून आम्ही एकमेकांना निरोप दिला  तेथून कुणाचाही पाया निघत नव्हतो. अखेर दुपारी ४.०० वाजता परतीच्या मार्गाला लागलो. हा मैत्रीचा ओलावा असाच अबाधित ठेऊन आपल्या उर्वरीत सवंगड्यांचा शोध घेऊन आम्ही त्याना ग्रुपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत  व आमचा पूर्ण ६० चा वर्ग पूर्ण करणार आहोत .


No comments:

Post a Comment